शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिकबंदीच्या नावाखाली बाजारपेठ अस्थिर करण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:06 IST

पर्यावरणाचा -हास होत असल्याच्या कारणावरून राज्य सरकारने प्लॅस्टिकबंदी आणली असून, शनिवार(दि. २३) पासून संपूर्ण राज्यभरात प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नाशिकमध्येही प्लॅस्टिकबंदीचे पडसाद उमटले.

नाशिक : पर्यावरणाचा -हास होत असल्याच्या कारणावरून राज्य सरकारने प्लॅस्टिकबंदी आणली असून, शनिवार(दि. २३) पासून संपूर्ण राज्यभरात प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नाशिकमध्येही प्लॅस्टिकबंदीचे पडसाद उमटले. कापड आणि किराणा व्यावसायिकांसह प्लॅस्टिकवर आधारित व्यवसायचालकांनी प्लॅस्टिकबंदीच्या नावाखाली बाजारपेठ अस्थिर करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करीत ब्रँडेड मालाला सशर्त परवानगी देऊन सर्वसामान्य व्यावसायिकांवर अन्याय केला जात असल्याची भावना व्यक्त केली. तर व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये पर्यायी व्यवस्थेशिवाय केलेल्या प्लॅस्टिकबंदीविषयी नाराजीचा सूर उमटत आहे. प्लॅस्टिकबंदीमुळे किराणा दुकानदारांसमोर किरकोळ मालाची विक्री कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. एक किंवा दोन किलोपेक्षा अधिक वजनाचे पुडे बांधणे शक्य होत नसल्याचे व्यापाºयांनी सांगितले. त्यामुळे बहुतांश दुकानांमध्ये प्लॅस्टिकमधील पॅकिंगच्या वस्तू जशाच्या तशा शनिवारीही दिसून आल्या. महापालिकेच्या आरोग्य विभागाने शनिवारी सकाळपासूनच प्लॅस्टिकचा वापर करणाºया दुकानदारांसह ग्राहकांवरही कारवाई सुरू केली असली तरी त्याचा परिणाम रस्त्यावर अनधिकृतपणे विविध वस्तूंची विक्री करणाºया विक्रेत्यांवरही दिसून आला नाही. रस्त्यावर विविध वस्तू प्लॅस्टिक वेष्टनासह विक्रीसाठी उपलब्ध होत्या, तर काही कापड व्यापारी आणि किराणा दुकानदारांनी कारवाईचा धसका घेत दुकानातील प्लॅस्टिक घाई गडबडीने हटविण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले. दरम्यान, सरकारने घाईघाईने केलेली प्लॅस्टिकबंदी उद्योग व्यवसायाला मारक असून, टप्प्याटप्प्याने व प्लॅस्टिकला पर्याय निर्माण करून सरकारने प्लॅस्टिकबंदी करणे गरजेचे होते, असे मत व्यापा-यांनी  व्यक्त केले. तसेच प्लॅस्टिकच्या वापरासाठी परवानगी मिळाल्यास त्याच्या पुनर्वापरासाठी संकलन करण्याची तयारीही व्यापाºयांनी दाखविली आहे.प्लॅस्टिक सर्वांचीच गरजबाजारातील दैनंदिन गरजेच्या प्लॅस्टिकच्या वस्तूंमध्ये ५० ते ६० टक्के भाग प्लॅस्टिक पिशव्यांचा असून, पिशव्या मिळत असल्याने त्यांचे महत्त्व सर्वांच्या लक्षात आले नव्हते. द्रवपदार्थांसह विविध किराणा मालातील वस्तू व दैनंदिन गरजांसाठी प्लॅस्टिक आवश्यक असून, त्याला समांतर पर्यायाशिवाय बंदी आणल्यामुळे सर्वांचीच गैरसोय होणार असल्याचे मत प्लॅस्टिक पिशव्यांचे वितरक आशिष बाफना यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी