शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ प्रतिनिधी निवडणूक; चर्चेला जोर

By admin | Updated: July 20, 2016 00:43 IST

निर्णयाची प्रतीक्षा : विद्यार्थ्यांचा निवडणुकांच्या बाजूने कल

नाशिक : शहरातील बहुतेक सर्वच महाविद्यालयांमध्ये प्रवेशप्रक्रिया पूर्णत्वास आल्याने आता विद्यापीठ प्रतिनिधी निवडणुकीच्या चर्चेने जोर धरला आहे. आतापर्यंत गुणवत्तेच्या आधारे विद्यापीठ प्रतिनिधी निवडला जात असतानाही विविध राजकीय पक्षांकडून नामांकित महाविद्यालयांमध्ये विद्यापीठ प्रतिनिधी असावा, यासाठी प्रयत्न केले जात होते. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यापीठ प्रतिनिधी निवडणुका घेण्याविषयी सरकारची सकारात्मक भूमिका स्पष्ट केल्यानंतर यावर्षी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून विद्यार्थी परिषद (स्टुडंट कौन्सिल) आणि विद्यापीठ प्रतिनिधी (जनरल सेक्रेटरी) निवडण्याच्या चर्चेला बळ मिळाले. बहुतेक विद्यार्थ्यांचा निवडणुका घेण्याच्या बाजूने कल असल्याचे दिसते. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनापासून लोकशाही प्रक्रियेचा भाग असलेल्या निवडणुका परिचित व्हाव्यात आणि देशात उत्तम नेतृत्व घडावे, हा या निवडणुकांमागील हेतू होता. परंतु १९९२ मध्ये मुंबईतील मिठीबाई महाविद्यालयात एका विद्यार्थ्याची निवडणुकीदरम्यान हत्त्या झाल्याने महाविद्यालयांतील निवडणुकीवर बंदी घालण्यात आली. निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांचा हस्तक्षेप वाढल्याने निवडणुकीदरम्यान मारामाऱ्या, खून होऊ लागल्याने या निवडणुकांना चाप लावला गेला. या निवडणुका पुन्हा सुरू करण्यासाठी गेली काही वर्षे सर्वच राजकीय पक्ष मागणी करीत होते. महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून स्टुडंट कौन्सिल आणि जनरल सेक्रेटरी निवडण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांना यापूर्वीच दिले असल्याने महाविद्यालयीन निवडणुकीचा विषय चर्चेत आला होता. त्यातच महाविद्यालयांमध्ये पुन्हा विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी १९९२च्या विद्यापीठ कायद्यात बदल करण्याचे सूतोवाच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केल्यानंतर विद्यापीठ प्रतिनिधी निवडणुकीची चर्चा जोर धरू लागली आहे. (प्रतिनिधी)