शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

अंडरपासचे काम पोलीस बंदोबस्तात

By admin | Updated: November 15, 2015 23:36 IST

लेखानगर : विरोध मोडून काढण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा निर्णय

नाशिक : इंदिरानगर येथील बोगदा बंद केल्यानंतर स्टेट बॅँक चौकाऐवजी लेखानगरनजीक अंडरपास करण्यास स्थानिक नागरिकांकडून होणारा विरोध लक्षात घेता, पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला असून, तसे पत्र पोलिसांना देण्यात आले आहे. येत्या आठवड्यात हे काम कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गोविंदनगर-इंदिरानगरला जोडणारा बोगदा सहा महिन्यांपूर्वी पोलिसांनी सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे इंदिरानगरहून गोविंदनगरकडे येऊ पाहणाऱ्या नागरिकांना थेट स्टेट बॅँक चौकानजीक वळसा घेऊन पुन्हा इंदिरानगर बोगद्यापर्यंत माघारी परतावे लागते. त्यासाठी साधारणत: दोन किलोमीटर अधिकचे अंतर कापावे लागते. मुळात इंदिरानगरचा बोगदा बंद करायला नागरिकांचा प्रचंड विरोध असताना त्यात पुन्हा त्यांना दोन किलोमीटरचा फेरा घालताना वेळ व पैशांची उधळपट्टी होत होती. इंदिरानगरचा बोगदा बंद करून स्टेट बॅँकेत वाहने वळविल्याने त्याठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊ लागली, त्यातच या ठिकाणी हॉस्पिटल असल्याने वाहनांचा गोंगाट होऊन सायलेंस झोनचे उल्लंघन होत असल्याची तक्रार केली जात होती. त्यावर तोडगा म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लेखानगर येथील बालभारती कार्यालयासमोरून अंडरपास सुरू करण्याची तयारी केली व त्याला प्राधिकरणाची अनुमतीही घेण्यात आली होती. महिनाभरापूर्वी सदरचे काम सुरू करताच, महापालिकेचे स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी लेखानगर येथे अंडरपास करण्यास विरोध दर्शविला होता. या कामासाठी गेलेल्या कामगारांना पिटाळून लावून दोन वेळा काम बंद केले होते. दरम्यान, लेखानगर येथील अंडरपाससाठी आग्रही असलेले पोलीस व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सदरचे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचा विडा उचलला असून, नागरिकांकडून होणारा विरोध मोडून काढण्यासाठी पोलीस बंदोबस्तात काम करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी पंधरा दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्तांना पत्र देऊन पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली होती, परंतु नवरात्र व दिवाळीनिमित्त पाहून पोलीस बंदोबस्त देण्यास आयुक्तांनी असमर्थता व्यक्त केली, आता मात्र पोलीस बंदोबस्त देण्याचे मान्य करण्यात येऊन तसे पत्रही पोलीस आयुक्तांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले दिले आहे. सूत्रांच्या मते पुढच्या आठवड्यात पोलीस बंदोबस्तात लेखानगर अंडरपासचे काम सुरू करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)