शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

नांदूर गावातील जुगार अड्ड्यावरील छाप्यात चार लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 16:42 IST

नाशिक : नांदूर गावातील एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर आडगाव पोलिसांनी शनिवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास छापा टाकला़ या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या पंधरा जुगा-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून मोबाइल, दुचाकी, रिक्षा व जुगाराचे साहित्य असा तीन लाख ९५ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ठळक मुद्देआडगाव पोलीस ठाणे : १५ संशयित ताब्यात

नाशिक : नांदूर गावातील एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर आडगाव पोलिसांनी शनिवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास छापा टाकला़ या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या पंधरा जुगा-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून मोबाइल, दुचाकी, रिक्षा व जुगाराचे साहित्य असा तीन लाख ९५ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नांदूर गावातील दर्ग्याशेजारी असलेल्या प्रशांत निकम यांच्या घरात जुगार सुरू असल्याची माहिती आडगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्यासह पथकाने या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी संशयित सागर भोजने (रा. रामायण अपार्टमेंट, जेलरोड), सुनील चव्हाण (रा. संतनगर, दसक), कानिफ सातभाई ( रा. नरहरीनगर, दसक), राजू पगार (रा. मोरे मळा, जेलरोड), किरण भालेराव (रा. मंगलमूर्तीनगर, जेलरोड), रमेश सूर्यवंशी (रा. पंचक गाव), शकील (रा. मंगलमूर्तीनगर, जेलरोड), उत्तम पगार (रा. गणपतनगर, नांदूर नाका), राजेश पटेल ( रा. वैशालीनगर, जेलरोड), शंकर बहिवाल (रा. संत नरहरीनगर, जेलरोड), सूरज चोरमले, विशाल धनराळे, राजेंद्र सोनवणे (तिघे रा. साईनगर,नांदूर गाव), विक्रम बोराडे (रा. चरणदास मार्केटजवळ, जेलरोड) व विवेक रसाळ (रा. वीर सावरकरनगर, जेलरोड) हे पत्त्याच्या कॅटवर पैसे लावून जुगार खेळत होते़

आडगाव पोलिसांनी या सर्व संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चार लाखांचा मुद्देमाल जप्तआडगाव पोलिसांनी या ठिकाणी छापा मारून १ लाख ९० हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी, ८५ हजार रुपये किमतीची रिक्षा, ४५ हजार रुपये किमतीचे १४ मोबाइल, ६८ हजार ३४० रुपयांची रोकड व १ हजार ८०० रुपयांचे पत्त्याचे कॅट असा तीन लाख ९५ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलीस ठाण्यांमध्ये नवीन वसुली अधिकारीपोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांमधील ४० कलेक्टर अर्थात वसुली अधिका-यांची बदली केली होती़ मात्र, या बदलीनंतर आता वसुली अधिका-यांची दुसरी फळी विविध पोलीस ठाण्यांमध्ये तयार झाली असून, त्यांच्या कृपाशीर्वादाने अवैध धंदे पुन्हा सुरू झाल्याचे चित्र आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस