शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

चोरचवडी धबधब्याच्या डोहात बुडून दोन युवकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 18:13 IST

पिंपळगाव वाखारी : दहिवड पासून पाच किमी अंतरावर असणाऱ्या भौरी शिवारातील डोंगररांगातून वाहणाºया चोर चवडी धबधब्याच्या डोहात पोहणाºया वडाळीभोई येथील दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. धबधब्याच्या परिसरात प्रथमच अशी दुर्घटना झाल्याने पर्यटकात भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देदहिवड येथील भौरी शिवारातील पोहताना घडली घटना

पिंपळगाव वाखारी : दहिवड पासून पाच किमी अंतरावर असणाऱ्या भौरी शिवारातील डोंगररांगातून वाहणाºया चोर चवडी धबधब्याच्या डोहात पोहणाºया वडाळीभोई येथील दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. धबधब्याच्या परिसरात प्रथमच अशी दुर्घटना झाल्याने पर्यटकात भीती निर्माण झाली आहे.यंदाच्या वर्षी प्रथमच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेला भौरी शिवारातल्या डोंगरातून वाहणारा चोरी चवडी धबधबा गेल्या अनेक वर्षांपासून वाहत असला तरी तिथे जाण्यासाठी रस्त्यांची गैरसोयींमुळे दुर्लक्षित होता. परंतु यंदा लवकर आलेल्या पावसामुळे धबधबा जून जुलै महिन्यापासूनच खळाळून वाहू लागला. काही हौशी पर्यटकांनी तेथील सहलीचे फोटो सोशल मीडिया वरून व्हायरल केल्याने पर्यटकांची मोठी गर्दी यंदा धबधबा परिसरात दिसू लागली. तीन टप्प्यात वाहणारा हा धबधबा तरु णाईच्या निसर्ग सफरीचा हॉटस्पॉट झाला. संपूर्ण जिल्ह्यातील पर्यटक यावर्षी येथे हजेरी लावत होते. दळणवळणाचे विशेष सोय नसली तरी होणारी गर्दी लक्षणीय असते. अशातच रविवारी (दि.१३)वडाळीभोई येथील युवकांचा ग्रुप येथे सहलीसाठी आला असताना धबधब्याच्या दुसºया टप्प्यातील डोहात पोहताना त्यातील शुभम नारायण गुजर (१८) व ऋ षिकेश शशिकांत तोटे (१८) यांचा दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान बुडून मृत्यू झाला. तर इतरांना वाचवण्यात यश आले. नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी घाव घेत डोहातून बुडश्लल्या दोघांना बाहेर काढले. पहिल्यांदाच धबधबा परिसरात घडलेल्या अपघातामुळे येणाºया पर्यटकांमध्ये भीती निर्माण झाल्याने धबधबा परिसरात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाय योजना करण्याची मागणी निसर्गप्रेमी नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दुर्घटनेचा पंचनामा करून देवळा पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करत आहे.