शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

४ वर्षांपूर्वी १७ लाखांची लूट करणाऱ्या टोळीमधील दोघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 16:53 IST

गुन्ह्यातील तीघे फरार होते, त्यापैकी दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने वडाळागाव, आडगावमधून सुमारे चार वर्षानंतर अटक केली.

ठळक मुद्देदोघांना वडाळागाव, आडगावमधून सुमारे चार वर्षानंतर अटक पोलीस मागावर; मात्र ते हुलकावणी देण्यास यशस्वी ठरत होते.

नाशिक : सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत १ जून २०१५ रोजी रात्रीच्या सुमारास एका वाइनशॉपचालकावर हल्ला करून सुमारे १७ लाख ७६ हजार रूपयांची जबरी लूट संशयित दहा संशयित दरोडेखोर पसार झाले होते. या गुन्ह्यात ७ संशयितांना अटक करून न्यायालयात गुन्हे शाखा-१च्या पथकाने दोषारोपपत्र दाखल केले. गुन्ह्यातील तीघे फरार होते, त्यापैकी दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने वडाळागाव, आडगावमधून सुमारे चार वर्षानंतर अटक केली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी खंडू लक्ष्मण शिरसाठ (४१) यांच्यावर दरोडेखोरांनी हल्ला करून जखमी करत त्यांच्याकडील सुमारे १७ लाख ७६ हजार रूपये लांबविले होते. या गुन्ह्यात दरोडेखोरांची टोळी पोलिसांनी निष्पन्न करून दोन महिन्यानंतर गुन्ह्याची उकल करून ७ संशयित दरोडेखोरांना अटक केली होती. या गुन्ह्यात ३ दरोडेखोर तेव्हापासून आजतागायत फरार झाले होते. पोलीस त्यांच्या मागावर होते; मात्र ते हुलकावणी देण्यास यशस्वी ठरत होते. गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या अधारे वडाळागावात एका पेट्रोलपंपाजवळ पथकाने सापळा रचला. यावेळी संशयित अमजद सय्यद हा इसम पेट्रोलपंपाजवळ आला असता साध्या वेशातील पोलिसांनी त्याला विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळ काढला. यावेळी सहायक निरिक्षक पुष्पा निमसे, हवालदार कोकाटे, स्वप्नील जुंद्रे, निलेश भोईर यांनी पाठलाग करून शिताफीने सय्यदच्या मुसक्या आवळल्या. त्यास न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (दि.१३) पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचा दुसरा फरार साथीदार रफिक शेख ऊर्फ सोनू याविषयी माहिती दिली. मिळालेल्या माहितीच्या अधारे पोलीस निरिक्षक आनंदा वाघ यांच्या पथकाने आडगाव वैद्यकिय महाविद्यालय चौफूलीच्या परिसरात सापळा रचला. यावेळी संशयित सोनू हा त्या ठिकाणी आला असता पथकाने त्याच्या मुसक्या बांधल्या. त्याने सय्यदसह अन्य साथीदारासोबत मिळून दरोडा टाकल्याची कबुली दिल्याचे वाघ यांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास निमसे करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटकRobberyचोरी