शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वायू प्रदूषण तपासणीची आणखी दोन केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 01:16 IST

राज्यातील प्रदूषणात वाढ होणाऱ्या १७ शहरांमध्ये नाशिक महापालिकेची निवड करण्यात आल्यानंतर शहरात आणखी दोन ठिकाणी वायू प्रदूषणासाठी मापन केंद्रे सुरू येणार आहे. विशेष म्हणजे सध्या फक्त प्रदूषण नियंत्रण मंडळच उपकरणांच्या स्थितीबाबत मॉनेटरिंग करते, परंतु आता महापालिका आणि वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय निगराणी करणार आहे.

नाशिक : राज्यातील प्रदूषणात वाढ होणाऱ्या १७ शहरांमध्ये नाशिक महापालिकेची निवड करण्यात आल्यानंतर शहरात आणखी दोन ठिकाणी वायू प्रदूषणासाठी मापन केंद्रे सुरू येणार आहे. विशेष म्हणजे सध्या फक्त प्रदूषण नियंत्रण मंडळच उपकरणांच्या स्थितीबाबत मॉनेटरिंग करते, परंतु आता महापालिका आणि वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय निगराणी करणार आहे.शनिवारी (दि.२१) महापालिकेच्या पर्यावरण समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने नॅशनल क्लिन एअर प्रोग्रॅम अंतर्गत राज्यातील १७ शहरात होणाºया प्रदूषणाच्या अनुषंघाने निवड केली असून, त्यात नाशिकचा समावेश आहे. या सर्व शहरांमध्ये वायू प्रदूषणाचे घटक कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. केंद्रसरकारच्या सूचनेनुसार महापालिकेने वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आराखडा सादर केला असून,तो केंद्र सरकारने मंजूर केला आहे. त्यानंतर आता शासनाच्या आदेशानुसार समितीही गठीत करण्यात आली आहे. या समितीची पहिली बैठक आयुक्तराधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. २१) पार पडली. यावेळी काही ठोस निर्णय घेण्यात आले.शहरात सध्या वायू प्रदूषणाची तपासणी करणारी पाच प्रदूषण मापन केंद्रे असून, आता महापालिकेच्या राजीव गांधी भवन या मुख्यालयात आणि त्यानंतर गुरुगोविंद सिंग कॉलेजजवळ असे दोन सेंटर म्हणजेच प्रदूषण मापनाची केंद्र सुरू करण्याचे ठरविण्यात आले.शहरात प्रदूषण वाढू नये यासाठी कारंजा असलेली वाहतूक बेटे निर्माण करण्यात येणार असून, व्हर्टिकल गार्डन ही कल्पना राबविण्यात येणार आहे. व्हर्टिकल गार्डन म्हणजेच भिंतीवरील हिरवळ असून, अनेक मॉल्समध्ये ती आढळते. बैठकीस महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पर्यावरण अधिकारी, औद्योगिक संघटना आणि विशेषत: सीईटीपी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :pollutionप्रदूषणRto officeआरटीओ ऑफीस