शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

दोन जेसीबींना चक्क एकच नंबरप्लेट

By admin | Updated: January 16, 2015 23:44 IST

सहायक वाहन निरीक्षकाची सतर्कता; मालकावर दंडात्मक कारवाई

नाशिक : प्रादेशिक परिवहन कार्यालयात एका जेसीबीच्या नोंदणीवर दोन जेसीबी चालविणाऱ्या मालकाचा सहायक मोटर वाहन निरीक्षक अतुल चव्हाण यांनी पर्दाफाश केला आहे़ या जेसीबींद्वारे व्यवसाय करून शासनाचा सुमारे पावणेदोन लाखांचा महसूल जेसीबी मालकाने बुडविला आहे़ दरम्यान, संबंधित जेसीबीमालकावर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दंडात्मक कारवाई केली असून, यानंतर फौजदारी गुन्हादेखील दाखल करण्यात येणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली आहे़मखमलाबाद येथील किशोर घुगे यांनी २००५ साली एक जेसीबी मशीन खरेदी केले व त्याची रितसर प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी केली़ या नोंदणीनंतर या जेसीबीला एमएच १५ एयू ६९४२ हा क्रमांक देण्यात आला़ यानंतर घुगे यांनी २००७ साली दुसरे जेसीबी खरेदी केले मात्र या मशीनची नोंदणी आरटीओ कार्यालयाकडे केलीच नाही़ जेसीबी हे वाहन ट्रान्सपोर्टमध्ये वा व्यावसायिक प्रणालीत मोडते़ त्याचा दरवर्षी आरटीओ टॅक्स भरावा लागतो़ मात्र मालक घुगे यांनी या वाहनाचा सात वर्षांपासून टॅक्सच भरलेला नाही़एकाच जेसीबीच्या नोंदणीवर दोन जेसीबी चालवून घुगे यांनी सात वर्षांपासून शासनाच्या महसूल बुडविला असून, तो सुमारे दीड ते पावणेदोन लाख रुपये आहेत़ प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत हे दोन्ही जेसीबी मशीन जप्त करण्यात आले असून, दंडात्मक कारवाई केली जाणार आहे़ तसेच दंड वसुलीनंतर फौजदारी गुन्हाही दाखल केला जाणार असल्याचे वृत्त आहे़ (प्रतिनिधी)