अमली पदार्थाच्या नशेत असलेले दोघे विद्यार्थी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 01:08 IST2019-10-21T01:07:36+5:302019-10-21T01:08:46+5:30

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एमडी पावडर (मेफेड्रोन) विक्र ी करताना मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ४ ग्रॅम वजनाची पावडर व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Two drug addicts in custody | अमली पदार्थाच्या नशेत असलेले दोघे विद्यार्थी ताब्यात

अमली पदार्थाच्या नशेत असलेले दोघे विद्यार्थी ताब्यात

ठळक मुद्देएमडी पावडरही आढळली : नशेसाठी वापरली जाते पावडर

नाशिक : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एमडी पावडर (मेफेड्रोन) विक्र ी करताना मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ४ ग्रॅम वजनाची पावडर व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश हिरे यांनी गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन उद्यानाजवळून अमली पदार्थाच्या नशेत असणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडील प्राथमिक चौकशीत त्याने मेफेड्रोन म्हणजेच एमडी पावडरची नशा केल्याचे उघडकीस आले. शहरातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली. त्यावेळी मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ प्रतिबंधक कक्षाच्या मदतीने साहिल शरफोद्दीन पठाण (२१, रा. खडकाळी) आणि नवाज रियाज सय्यद (१९, रा. मुंबई नाका) या दोघा संशयितांना अटक करण्यात आली. हे दोघेही संगनमत करून एमडी पावडर विक्री करीत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. त्यांच्याकडून ३८ हजार १०० रु पयांचे अमली पदार्थ व इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two drug addicts in custody