शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

मध्यचा बारा, तर बाह्यचा एकपर्यंत निकाल

By admin | Updated: October 17, 2014 22:59 IST

तयारी पूर्ण : मालेगावी दोन ठिकाणी होणार मतमोजणी

मालेगाव : मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी येथील महसूल व निवडणूक प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले आहे. मालेगाव मध्यची मतमोजणी श्रीरामनगर येथील छत्रपती शिवाजी जिमखाना येथे, तर मालेगाव बाह्यची मतमोजणी ही सोयगाव येथील ऐश्वर्या मंगल कार्यालय येथे होणार आहे. रविवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी दोन्ही ठिकाणी प्रत्येकी १४ टेबल मांडण्यात आली आहेत. त्यानुसार मालेगाव मध्यमधील २१९ इलेक्ट्रॉनिक यंत्रांमधील मतमोजणी करण्यासाठी १५ तर मालेगाव बाह्यमधील २९८ इलेक्ट्रॉनिक यंत्रांमधील मतमोजणीसाठी २२ फेऱ्या लागणार आहेत. तसेच पोस्टल मतदानासाठी प्रत्येकी दोन टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ होईल. सर्वप्रथम पोस्टल मतदानाची मोजणी होईल. प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी सकाळी सात वाजेपर्यंत प्राप्त होणारी पोस्टल मते ही मतमोजणीसाठी ग्राह्य धरली जाणार आहेत. एका टेबलावर पाचशे याप्रमाणे पोस्टल मतमोजणी होईल. सर्व पोस्टल मतांची एकूण मोजणी आणि नंतर उमेदवारनिहाय त्याची वर्गवारी व मोजणी असे या मोजणीचे स्वरूप राहणार आहे. त्यासाठी प्रशासनाने जवळपास अर्धा ते पाऊण तास गृहित धरला आहे. त्यानंतर साधारण साडेआठ ते पावणेनऊ वाजेच्या सुमारास इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील मतमोजणीस प्रारंभ होईल. चौदा टेबलांवर एकाचवेळी चौदा मतदानयंत्रांमधील मतमोजणी होईल. मालेगाव मध्यमध्ये निवडणूक रिंगणात १२ उमेदवार असल्याने येथील एका फेरीस साधारण १५ मिनिटे तर मालेगाव बाह्यमध्ये दहा उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने येथील एका फेरीस साधारण १३ मिनिटांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे मालेगाव मध्यचा अंतिम निकाल साडेअकरा ते बारा वाजता जाहीर होण्याची शक्यता आहे. मालेगाव बाह्यचा अंतिम निकाल हा दुपारी एक वाजेच्या सुमारास लागण्याची शक्यता आहे.