शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

साडेनऊशे कोटींची वसुली अडचणीत ?

By admin | Updated: November 19, 2016 00:48 IST

पीककर्ज : १५ तालुक्यांत कोटींची थकबाकी

 नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची यावर्षाची सुमारे ९४८ कोटींची थकबाकी रिझर्व्ह बँकेच्या एका आदेशाने धोक्यात आली आहे. ही बंदी उठविली गेली नाही तर, ही पीककर्ज वसुली लहान नोटांनी कधी होणार असा यक्षप्रश्न जिल्हा बॅँकेच्या वसुली अधिकाऱ्यांसमोर पडल्याची चर्चा आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने मागील वर्षी सुमारे १२०० कोटींहून अधिक पीककर्ज वाटप केले होते. मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने ज्या गावांची आणेवारी ५० पैशाच्या आत आहे, अशा गावांमधील पीककर्ज थकीत शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली करण्यास जिल्हा बॅँकांना बंदी घातल्याने मागील वर्षी जिल्हा बॅँकेच्या पीककर्ज वसुलीवर त्याचा मोठा प्रतिकूल परिणाम झाल्याचे जिल्हा बॅँकेच्या सूत्रांचे म्हणणे आहे. त्यातही पीककर्ज वसुलीत सर्वांत आघाडीवर जिल्ह्यात दोनच तालुके आहेत. त्यात चांदवड व नाशिकचा समावेश आहे. एकूण ९४८ कोटींच्या थकबाकीत नाशिक तालुक्याकडे तीन कोटी, तर चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांकडे पाच कोटी अशी पीककर्ज थकबाकी असल्याचे एका संचालकाचे म्हणणे आहे. म्हणजेच उर्वरित १३ तालुक्यांत मिळून थोडीथोडकी नव्हे तर चक्क ९४० कोटींची पीककर्जाची वसुली थकली आहे. रिझर्व्ह बॅँकेने आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकांना ५०० आणि १००० च्या नोटा स्वीकारण्यास बंदी घातल्याने त्याचा थेट परिणाम पीककर्ज वसुलीवर होण्याची दाट शक्यता आहे. कारण तीन दिवसांत चार कोटींची पीककर्ज वसुली झाल्याचे ताज्या आकडेवारीतून दिसते. आता या वर्षाची थकीत ९४८ कोटींची थकीत पीककर्ज वसुली आणि मागील वर्षी वितरीत केलेल्या एकूण पीककर्ज वसुलीच्या रखडलेल्या ४० टक्के पीककर्ज वसुलीची चिंंता वसुली अधिकाऱ्यांना सतावत आहे. (प्रतिनिधी)