शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

वेद मंत्रोच्चारात तुलसी विवाह सोहळा संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 01:27 IST

वेद मंत्रांचा उच्चार, मंगलाष्टकांच्या आवाजाने भरलेले सभागृह आणि साजशृंगार करून आलेले पाहुणे यांच्या मांदियाळीत हारफुलांनी सजलेल्या तुलशी व श्रीकृष्णाचा थाटामाटात विवाह लावण्यात आला.

नाशिक : वेद मंत्रांचा उच्चार, मंगलाष्टकांच्या आवाजाने भरलेले सभागृह आणि साजशृंगार करून आलेले पाहुणे यांच्या मांदियाळीत हारफुलांनी सजलेल्या तुलशी व श्रीकृष्णाचा थाटामाटात विवाह लावण्यात आला. यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचा परिसर विविध दिवे, रोषणाई आणि फटाक्यांच्या आवाजाने दणाणून गेला होता. अखिल भारतीय ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या सभागृहात रविवारी (दि.१०) तुलशी विवाह संपन्न झाला. संस्थेचे केंद्रप्रमुख सतीश करजगीकर व सुजाता करजगीकर या दाम्पत्याच्या हस्ते हा विवाह सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे पौराहित्य चंद्रशेखर गायधनी यांनी केले.अखिल भारतीय ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचा उपक्रम :तुलसी विवाह सोहळ्यानिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर दीपावली मीलन सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. तुलसी विवाहानिमित्त संस्थेचा परिसर सुशोभित करण्यात आला होता. तुलसी विवाहानिमित्त विविध फळे-फुलांची सजावट, चौरंगावर विविध धान्यांच्या राशी, एका चौरंगावर साजशृंगार केलेली तुलसीचे रोपटे आणि समोर श्रीकृष्णाच्या मूर्तिलाही सजविण्यात आले होते. महापूजा झाल्यानंतर मंगलाष्टकांनी हा विवाह सोहळा पार पडला. आरतीनंतर प्रसाद वाटप करून विवाह सोहळ्याची सांगता झाली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम