मालेगाव वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे पत्रकार दत्ता वडगे यांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 08:31 PM2020-07-11T20:31:41+5:302020-07-12T02:05:23+5:30

मालेगाव : येथील ज्येष्ठ पत्रकार स्व. दत्ता वडगे यांना मालेगाव वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. स्व. वडगे शहरातील अनेक संस्थांचे संस्थापक होते.

Tribute paid to journalist Datta Wadge on behalf of Malegaon Newspaper Vendors Association | मालेगाव वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे पत्रकार दत्ता वडगे यांना श्रद्धांजली

मालेगाव वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे पत्रकार दत्ता वडगे यांना श्रद्धांजली

Next

मालेगाव : येथील ज्येष्ठ पत्रकार स्व. दत्ता वडगे यांना मालेगाव वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.
स्व. वडगे शहरातील अनेक संस्थांचे संस्थापक होते. मालेगाव शहरातील शांतता समिती, गणेश उत्सव समिती, शिवजयंती समिती, राष्ट्रीय सेवा दल, काकाणी वाचनालय तसेच पत्रकारितेत त्यांचे मोठे योगदान होते. साने गुरुजी, आचार्य विनोबा भावे, एस. एम. जोशी, दादासाहेब पोतनीस यांच्या विचारांनी ते प्रभावित होते. समाजकारणातूनच त्यांनी मालेगाव नगर परिषदेचे नगरसेवकपदही भूषविले होते. समाजकार्याचा वसा घेतलेल्या वडगे हे मालेगाव तालुका पत्रकार संघाचे संस्थापक होते.
संपूर्ण मालेगाव शहरात नव्हे तर तालुक्यात आपल्या समाजकार्याने नागरिकांना परिचित असलेल्या दत्ताजी वडगे यांच्या निधनाने मोठी हानी झाली आहे. ही पोकळी कधीही भरून निघणार नाही, अशा शब्दांत संघटनेचे सचिव रवि कुलकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय जगताप, उपाध्यक्ष पापा यादव, मधू यादव, संतोष शर्मा, गजानन यादव, दीपक यादव, दिनेश जाधव, नामदेव यादव, हरीश यादव, रमेश पाटील, नीलेश यादव आदींसह वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.

Web Title: Tribute paid to journalist Datta Wadge on behalf of Malegaon Newspaper Vendors Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक