शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

द्वारकावर वाहतूक कोंडी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 01:23 IST

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. विशेषत: सकाळी १० ते १२ व सायंकाळी ५ ते ७ यावेळेत मोठ्या संख्येने वाहतूक कोंडी होते़ नाशिक-पुणे, मुंबई-आग्रा महामार्गासह शहरातील विविध मार्गांना जोडणारा हा मुख्य चौक असल्याने चारही बाजूने येणाºया वाहनांची संख्या अधिक असल्याने येथील वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. त्यामुळे द्वारका चौकातील वाहतूक कोंडी कधी फुटणार? असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे. विशेष म्हणजे येथील वाहतूक कोंडी फोडताना वाहतूक पोलिसांनादेखील मोठी कसरत करावी लागते.

ठळक मुद्देवाहनचालक त्रस्त : पोलिसांची कसरतशहरांना विविध मार्गांना जोडणारा मुख्य चौक

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. विशेषत: सकाळी १० ते १२ व सायंकाळी ५ ते ७ यावेळेत मोठ्या संख्येने वाहतूक कोंडी होते़ नाशिक-पुणे, मुंबई-आग्रा महामार्गासह शहरातील विविध मार्गांना जोडणारा हा मुख्य चौक असल्याने चारही बाजूने येणाºया वाहनांची संख्या अधिक असल्याने येथील वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. त्यामुळे द्वारका चौकातील वाहतूक कोंडी कधी फुटणार? असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे. विशेष म्हणजे येथील वाहतूक कोंडी फोडताना वाहतूक पोलिसांनादेखील मोठी कसरत करावी लागते.मुंबई-आग्रा महामार्गाच्या विस्तारीकरणामध्ये उड्डाणपूल झाल्यानंतर या ठिकाणी पादचाºयांसाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आला. या मार्गामुळे द्वारका चौकातील वाहतूक कोंडी दूर होईल. अशी नागरिकांची अपेक्षा होती़ मात्र, वाहतूक कोंडी दूर होण्याऐवजी कोंडी फोडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे चौकातील वाहतुकीची स्थिती बिकट झाली आहे. विशेष म्हणजे पादचाºयांसाठी तयार करण्यात आलेला हा चौकातील भुयारी मार्गदेखील बंद आहे़ जुने नाशिक तसेच सारडा सर्कलकडून येणारे वाहनचालक बेशिस्तपणे वाहने चालवित असल्याने या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते़ यामुळे केवळ वाहनधारकच नव्हे तर विद्यार्थी, पादचारी, ज्येष्ठ नागरिक, महिला यांनाही रस्ता ओलांडण्यासाठी कसरत करावी लागते.या ठिकाणच्या वाहतूक कोंडीत परिसरातील रिक्षाचालक व बसच्या थांब्यामुळे आणखी भर पडते़ रिक्षाचालकांची मुजोरी वाढत चालली असून, रस्त्यात कुठेही रिक्षा उभ्या करून प्रवासी बसविले जातात. तसेच द्वारका पोलीस चौकीजवळ असलेला बसथांबा व तिथेच उभे असलेले रिक्षाचालक यांच्यामध्ये वादाच्या घटनाही यापूर्वी घडलेल्या आहेत़ काठेगल्ली चौक ते द्वारकापर्यंतचा रस्त्यावर फळविक्रेते ठिकठिकाणी उभे असतात़ त्यामुळे नाशिकरोडहून शालिमारकडे जाणारी वाहतुकीस अडथळा होतो़ द्वारका सर्कलवरील या वाहतूक कोंडीमुळे या ठिकाणीरोजच लहान-मोठे अपघात होतात. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी नियोजनाची नितांत आवश्यकता आहे़सकाळ, सायंकाळी वाहनांच्या रांगाद्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडी ही नेहमीचीच झाली आहे. विशेषत: सकाळी १० ते १२ व सायंकाळी ५ ते ७ यावेळेत मोठ्या संख्येने वाहतूक कोंडी होते़४शहरातील विविध मार्गांना जोडणारा हा मुख्य चौक असल्याने चारही बाजूने येणाºया वाहनांची संख्या अधिक असल्याने येथील वाहतूक कोंडी ही नित्याचीच बनली आहे.४वाहतूक कोंडी फोडताना वाहतूक पोलिसांनादेखील मोठी कसरत करावी लागते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस