शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

आज मतदारराजाचा दिवस

By admin | Updated: February 20, 2017 23:10 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक : मालेगावी ९४ मतदान केंद्र संवेदनशील; कडक पोलीस बंदोबस्त

नाशिक : जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी ३३६, तर पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी १०१० उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम यंत्रात बंद होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात २६५३ मतदान केंद्र असून, त्यातील २५३ सवंदेनशील आहेत. एकूण २४ लाख मतदार या निवडणूक मतदान करणार आहेत. या निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर साहित्य रवाना करण्यात आले असून, चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सात गट व पंचायत समितीच्या १४ गणांसाठी मंगळवारी मतदान होत असून, मतदान कर्मचारी मतदान साहित्य घेऊन केंद्रांकडे रवाना झाले आहेत. सोमवारी सकाळपासून येथील छत्रपती शिवाजीमहाराज जिमखान्याच्या आवारात मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले.मंगळवारी होत असलेल्या मतदानप्रक्रियेसाठी एक हजार ५९४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान कर्मचारी, एक शिपाई, तर चौदाशे मतदारसंख्या असलेल्या केंद्रांवर चार मतदान कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी सकाळपासून निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुरेश कोळी, गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांनी मतदान कर्मचाऱ्यांना मतदानप्रक्रियेविषयी माहिती दिली. यानंतर उपस्थित कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील विविध गावांमधील मतदान केंद्रांवर साहित्य व कर्मचारी पोहोचविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या ४० बसेस, तर खासगी ४० वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूकप्रक्रियेसाठी १४ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पांढऱ्या रंगाच्या मतपत्रिका असलेल्या मतदानयंत्रावर जिल्हा परिषदेसाठी, तर गुलाबी रंगाच्या मतपत्रिकेवर पंचायत समितीसाठी मतदान घेतले जाणार आहे. ५५४ मतदानयंत्रांमध्ये तालुक्यातील उमेदवारांचे भवितव्य बंद होणार आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद गटाच्या सात जागांसाठी ३१ उमेदवार, तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ६३ उमेदवार असे एकूण ९४ उमेदवार रिंगणात आहेत.  जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानप्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ९४ मतदान केंद्र संवेदनशील, तर निमगाव येथील ५ केंद्र अतिसंवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. या संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त   पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. (प्रतिनिधी)