बारावीच्या फेर परीक्षेचा आज निकाल

By Admin | Updated: August 24, 2016 00:57 IST2016-08-24T00:55:40+5:302016-08-24T00:57:40+5:30

बारावीच्या फेर परीक्षेचा आज निकाल

Today's results of HSC exams | बारावीच्या फेर परीक्षेचा आज निकाल

बारावीच्या फेर परीक्षेचा आज निकाल

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या फेर परीक्षेचा निकाल बुधवारी (दि. २४) जाहीर करण्यात येणार आहे.
दुपारी एक वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर हा निकाल आणि विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका उपलब्ध होणार आहेत. तर विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप त्यांच्या संबंधित कनिष्ठ महाविद्यालयामार्फत करण्यात येणार असून त्याबाबत स्वतंत्र तारीख कळविण्यात येणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करायची आहे, त्यांनी विहित नमुन्यात शुल्कासह २५ आॅगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान विभागीय मंडळाकडे अर्ज करायचा आहे, असे बोर्डाच्या विभागीय अध्यक्षांनी कळविले आहे.

Web Title: Today's results of HSC exams