गोदाई प्रदर्शनाचे आज उद्घाटन

By Admin | Updated: March 4, 2017 01:44 IST2017-03-04T01:44:04+5:302017-03-04T01:44:16+5:30

नाशिक : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने ४ ते १० मार्च दरम्यान ‘गोदाई’ या विभागीय प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Today's inauguration of the Godavari exhibition | गोदाई प्रदर्शनाचे आज उद्घाटन

गोदाई प्रदर्शनाचे आज उद्घाटन

 नाशिक : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय आयुक्तकार्यालय व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने ४ ते १० मार्च दरम्यान ‘गोदाई’ या विभागीय प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामविकास व महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते या गोदाई प्रदर्शनाचे उद््घाटन होणार आहे. डोंगरे वसतिगृहावर आयोजित या गोदाई प्रदर्शनाच्या उद््घाटन कार्यक्रमास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, केंद्रीय संंरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नाशिक विभागातील महिला स्वयंसहाय्यता बचत समूहांनी व ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या वस्तुंचा या प्रदर्शनात समावेश
आहे. प्रदर्शन सकाळी १० ते रात्री १० या वेळेत नागरिकांसाठी खुले राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Today's inauguration of the Godavari exhibition