शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

पर्याय निवडण्याची आज अखेरची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:14 IST

अकरावी प्रवेश : पहिल्या फेरीत ७,७७४ प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अकरावीत प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांना दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी त्यांच्या अर्जातील शाखा व महाविद्यालयांच्या पसंतीक्रमात फेरबदल करण्यासाठी मंगळवारी (दि. १८) अखेरची मुदत असून, पहिल्या फेरीत पसंतीचे महाविद्यालय मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जात फेरबदल करता येणार आहे. पहिल्या फेरीत ७,१५७ विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कारणांनी पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित न करता चांगल्या पर्यायाची प्रतीक्षा करण्याची भूमिका घेतली असून, यातील अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाखा आणि महाविद्यालयांच्या पसंतीक्रमात बदल केले आहेत. पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेशाची संधी मिळालेल्या एकूण १४ हजार ९६५ पैकी सात हजार ७७५ विद्यार्थ्यांनी कला, वाणिज्य, विज्ञान व एमसीव्हीसी या अभ्यासक्र मांसाठी प्रवेश घेतला आहे. अनेक विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले नसले तरी त्यांनी दुसऱ्या पसंतीच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला, तर बहुतेक विद्यार्थ्यांनी दुसऱ्या फेरीत तरी अपेक्षित महाविद्यालयात प्रवेश मिळेल, या आशेने दुसऱ्या गुणवत्ता यादीची प्रतीक्षा करण्याची भूमिका अवलंबली आहे. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांना १८ जुलैपर्यंत महाविद्यालयाचा पसंतीक्र म व शाखा बदलण्याची संधी देण्यात आली आहे.