एसटी कामगार संघटनेचे आज धरणे

By Admin | Updated: August 5, 2014 01:56 IST2014-08-05T01:22:23+5:302014-08-05T01:56:53+5:30

एसटी कामगार संघटनेचे आज धरणे

Today's collapse of ST trade union | एसटी कामगार संघटनेचे आज धरणे

एसटी कामगार संघटनेचे आज धरणे


नाशिक : परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने उद्या दि. ५ रोजी विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना ५०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते; या रकमेचे वाटप कधी होणार हे जाहीर करावे, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. याशिवाय प्रवासी कर कमी करावा, डिझेलच्या दरात वारंवार होणारी वाढ या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी या आंदोलन होणार असल्याची माहिती संघटनेचे विभागीय सचिव प्रमोद भालेकर यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Today's collapse of ST trade union