आज दोन मिनिटे मौन

By Admin | Updated: January 29, 2016 23:36 IST2016-01-29T23:33:39+5:302016-01-29T23:36:28+5:30

आज दोन मिनिटे मौन

Today for two minutes silence | आज दोन मिनिटे मौन

आज दोन मिनिटे मौन

नाशिक : भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात प्राणार्पण करणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी उद्या शनिवारी (३०) रोजी सकाळी ११ ते ११.०२ वाजेपर्यंत दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहण्यात येणार आहे. त्यासाठी शहरात नागरी संरक्षण विभागातर्फे भोंगा वाजविण्यात येणार असून, भोंगा संपल्यानंतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, आस्थापना, शैक्षणिक संस्था, विद्यापीठ कर्मचारी, अधिकाऱ्यांनी दोन मिनिटे मौन पाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Web Title: Today for two minutes silence