शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनिअरिंग, फार्मसीसाठी आज गुणवत्ता यादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:24 IST

इंजिनिअरिंग व फार्मसी या पदवी शिक्षणक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची वाढीव मुदत गुरु वारी (दि. २१) संपली. आता विद्यार्थ्यांचे लक्ष गुणवत्ता यादीकडे लागले असून, रविवारी (दि. २४) पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.

नाशिक : इंजिनिअरिंग व फार्मसी या पदवी शिक्षणक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची वाढीव मुदत गुरु वारी (दि. २१) संपली. आता विद्यार्थ्यांचे लक्ष गुणवत्ता यादीकडे लागले असून, रविवारी (दि. २४) पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.  त्यानंतर २५ ते २८ जून कॅप राउंड-१ नुसार जागावाटप होईल, तर ३० जून ते ४ जुलै यादरम्यान रिपोर्टिंग सेंटरद्वारे (एआरसी) प्रवेश घेता येईल. फार्मसीसाठी २४ जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. २४ ते २७ जून यादरम्यान कॅप राउंड-१ असेल, तर २९ जून ते २ जुलै रोजी रिपोर्टिंग सेंटरद्वारे प्रवेश घेता येणार आहे.एमबीए आॅनलाइन अर्जांची मुदतव्यवसाय व्यवस्थापन शास्त्र पदव्युत्तर पदवी (एमबीए) अभ्यासक्रम प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना गुुरुवारपर्यंत (दि. २८) आॅनलाइन अर्ज दाखल करता येणार असून, याच कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रही संकेतस्थळावर अपलोड करावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे आॅनलाइन दाखल केलेल्या अर्जांची पडताळणी व निश्चितीही विद्यार्थ्यांना गुरुवारपर्यंतच करून घ्यावी लागणार आहे. २९ जून रोजी प्रारूप गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.मार्गदर्शन कार्यशाळाएमबीए व एमसीए प्रवेशप्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटमध्ये मंगळवारी (दि. २६) सकाळी साडेदहा वाजता कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत एमबीए व एमसीए प्रवेशप्रक्रियेची माहिती तज्ज्ञांकडून दिली जाणार आहे.थेट द्वितीय वर्ष पॉलिटेक्निकसाठी अर्ज करण्याची संधीतंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) अभ्यासक्र माच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेशप्रक्रिया २१ जूनपासून सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना १६ जुलैपर्यंत आॅनलाइन पद्धतीने प्रवेश अर्जासह आवश्यक कागदपत्र अपलोड करावे लागणार आहे. तर थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी २५ जूनपासून १२ जुलैपर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार आहे. थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी १३ जुलैला प्रारूप गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी