शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

तीन तासांच्या चर्चेचा ‘कचरा’

By admin | Updated: December 19, 2014 00:34 IST

त्र्यंबकच्या कचऱ्याचा प्रस्ताव : सदस्यांचा प्रचंड विरोध, महापौरांकडून मात्र आयुक्तांना अधिकार

नाशिक : त्र्यंबकेश्वर नगरपालिका हद्दीतील घनकचरा नाशिक महापालिकेच्या खतप्रकल्पावर स्वीकारण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या महासभेत सदस्यांनी प्रचंड विरोध दर्शविला. खतप्रकल्पाचा झालेला कचराडेपो आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सार्वजनिक आरोग्याच्या समस्या यावरही सदस्यांनी प्रशासनावर हल्लाबोल केला. दरम्यान, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सरकारचा निर्णय कसे मान्य करणे बंधनकारक आहे, हे पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. तब्बल तीन तास चाललेल्या या चर्चेत एकूणच सभागृहाचा नूर विरोधाचा असताना महापौरांनी याप्रश्नी प्रशासनाला सर्वाधिकार देत कचऱ्याचा प्रस्ताव आयुक्तांच्या टोपलीत टाकून दिला. महापालिकेच्या महासभेत त्र्यंबकेश्वर नगरपालिका हद्दीतील घनकचरा नाशिक महापालिकेच्या खतप्रकल्पावर स्वीकारण्याचा प्रस्ताव चर्चेला आला असता सदस्यांनी तीव्र विरोध दर्शविला. शिवाजी चुंभळे, सुदाम कोंबडे, अरविंद शेळके या स्थानिक नगरसेवकांनी खतप्रकल्पाची दुरवस्था कथन करत अगोदरच कचऱ्याचे ढीग साचले असताना आणखी त्र्यंबकच्या कचऱ्याचा वानोळा कशाला, असा सवाल केला. सभागृहात तीन वेळेस हा प्रस्ताव आणण्यात आला आणि त्यास सातत्याने विरोध होत असतानादेखील कचरा स्वीकारण्याचा आग्रह कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करत या सदस्यांनी खतप्रकल्पाची पाहणी करण्याची विनंती आयुक्तांना केली. संभाजी मोरुस्कर यांनी निर्माल्य न स्वीकारण्याबाबतचा अगोदरचा ठराव शासनाकडे विखंडित करण्यासाठी प्रशासनाकडे पाठविल्याबद्दल जाब विचारला. शोभा आवारे यांनी ‘घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे’ अशा शब्दात त्र्यंबकच्या कचऱ्याला विरोध दर्शविला. संजय चव्हाण यांनी तर कचरा स्वीकारण्याबाबत शासन जर आग्रह धरत असेल तर न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. उद्धव निमसे यांनीही हरित लवादाने दिलेल्या आदेशाची तप्तरता कचऱ्याबाबत दाखविली तशी गोदावरी प्रदूषणाच्या निर्णयाबाबत का दाखविली नाही, असा सवाल उपस्थित केला. अजय बोरस्ते यांनी अगोदर आपला खतप्रकल्पच धडपणे चालविला जाऊ शकत नाही, तेथे बाहेरचा कचरा कसा आणला जातोय, असा जाब विचारला. शाहू खैरे यांनी सरकारी आदेशाची व कायद्याची भोकाडी दाखवून हा प्रस्ताव मंजूर करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप केला. कविता कर्डक, तानाजी जायभावे, रमेश धोंगडे यांनीही खतप्रकल्पातील वास्तव मांडले.