शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

युवकाच्या मृत्यूनंतर तणाव

By admin | Updated: September 30, 2016 00:45 IST

टाके घोटी : शाळा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप

घोटी : इगतपुरी तालुक्यातील टाके घोटी शिवारात असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत बुधवारी संध्याकाळी शाळेचा फलक लावण्यासाठी सुमारे साठ फूट उंचावर गेलेल्या युवकाचा सिमेंटचा पत्रा फुटल्याने उंचावरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. शाळा प्रशासनाने मृत युवकाच्या नातलगांना न कळवता जबाबदारी झटकल्याने संतप्त झालेल्या नातलगांनी आणि घोटी ग्रामस्थांनी आज सकाळी या युवकाचा मृतदेह शाळेच्या आवारात आणून ठेवला. जोपर्यंत शाळा प्रशासन जबाबदारी स्वीकारत नाही व योग्य तोडगा काढीत नाही तोपर्यंत शाळेच्या आवारातून मृतदेह हालविणार नाही व अंतिम संस्कार करणार नाही, अशी भूमिका शाळेच्या आवारात जमलेल्या शेकडो जणांनी घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.घोटी येथील रवींद्र वासुदेव रसाळ (३०) याचा पेंटर व बॅनर तयार करण्याचा व्यवसाय आहे. त्याला टाके घोटी येथील पंचवटी इंग्लिश स्कूलमध्ये फलक तयार करण्याचे काम मिळाले होते. बुधवारी संध्याकाळी रवींद्र तयार झालेला फलक घेऊन शाळेत गेला असता त्याला शाळेच्या मुख्याध्यापकाने फलक शाळेच्या इमारतीवर लावण्याची बळजबरी केली. इच्छा नसतानाही रवींद्र साठ फूट उंचीच्या छतावर चढला; मात्र सिमेंटचा पत्रा अचानक तुटल्याने या पत्र्यासह रवींद्र साठ फूट जमिनीवर कोसळला. यात त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान, शाळा व्यवस्थापनाने या बाबीकडे दुर्लक्ष करीत जबाबदारी झटकत नातलगांना न कळविता मृतदेह परस्पर रुग्णालयात हलविला. दरम्यान, सदरचा प्रकार आज सकाळी नातलगांना समजल्यानंतर त्यांनी याबाबत जाब विचारण्यासाठी शाळेत धाव घेतली. (वार्ताहर)