जिल्हा बॅँक शाखेला शिक्षकांनी ठोकले टाळे

By Admin | Updated: March 30, 2017 01:18 IST2017-03-30T01:17:53+5:302017-03-30T01:18:07+5:30

सटाणा : शिक्षकांच्या पगाराची रक्कम खात्यावर जमा होऊनही जिल्हा बँकेच्या येथील शहर शाखेत शिक्षकांना फक्त हजार रु पयेच काढता येतील, असा फतवा काढला.

Teachers blocked the district bank branch | जिल्हा बॅँक शाखेला शिक्षकांनी ठोकले टाळे

जिल्हा बॅँक शाखेला शिक्षकांनी ठोकले टाळे

सटाणा : शिक्षकांच्या पगाराची रक्कम खात्यावर जमा होऊनही जिल्हा बँकेच्या येथील शहर शाखेत शिक्षकांना फक्त हजार रु पयेच काढता येतील, अशी भूमिका बँक व्यवस्थापकांनी घेतल्याने संतप्त शिक्षकांनी बुधवारी (दि. २९) बँकेला टाळे ठोकून कर्मचाऱ्यांना तीन तास डांबून ठेवले. शिक्षकांच्या या भूमिकेमुळे बँक प्रशासनाने नमते घेत खातेदाराला चार हजार रु पयांची रक्कम देण्याचे मान्य केले. त्यानंतर शिक्षकांनी आंदोलन मागे घेतले.  पगार खात्यावर जमा झाल्याने येथील शहर शाखेत रक्कम काढण्यासाठी शाळांचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी रांगा लावल्या होत्या. मात्र बँक व्यवस्थापकांनी संबंधित खातेदारांना प्रत्येकी फक्त एक हजार रु पयेच काढता येतील, असा फतवा काढला. या फतव्यामुळे शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक बच्छाव, चंद्रकांत सोनवणे, हरिभाऊ कोर व्यवस्थापक पवार यांना जाब विचारण्यास गेले असता गरमागरमी झाली. त्यानंतर संतप्त शिक्षकांनी बँकेला टाळे ठोकून अधिकारी व कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले. शिक्षकांच्या भूमिकेमुळे बँक प्रशासनाने बँकेच्या कार्यकारी संचालकांनी आंदोलनकर्त्या शिक्षकांशी दूरध्वनीवर चर्चा केली. त्यानंतर श्यामराव अहिरे यांना मार्केट यार्ड व मुख्य शाखेमधून दोन लाख रु पये कॅश उपलब्ध करण्याचे आदेश दिले. त्यांनी तत्काळ आदेशाची अंमलबजावणी करून कॅश उपलब्ध करण्यात आली. प्रत्येक खातेदाराला चार हजार रु पये देण्याचे आश्वासन दिल्यानंतर टाळे उघडण्यात आले. दरम्यान, खात्यावर रक्कम शिल्लक असताना चार हजार दिले जातात, अशीच परिस्थिती राहिल्यास शिक्षकांचे घरभाडे, किराणा, दूध, आजारपण, मुलांचे शिक्षण आदि खर्च कसा करायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा बँकेला अशाच अडचणी असतील तर आमचे पगार शासनाने राष्ट्रीयीकृत बँकेत जमा करावेत अन्यथा नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशाराही यावेळी शिक्षकांनी दिला. आंदोलनात विनायक बच्छाव, चंद्रकांत सोनवणे, अरु ण पाटील, सचिन सोनवणे, हरिभाऊ कोर, पप्पू सोनवणे, योगेश देवरे, साहेबराव गरु ड, रमेश खैरनार, सुरेश भामरे, एस.डी. पाटील, मुन्ना बेग, मुझफ्फर पटेल, प्रभावती कापडणीस, एच.पी. पवार, एस.व्ही.भामरे आदि सहभागी झाले होते.

 

Web Title: Teachers blocked the district bank branch