टीसीएस प्रकरण; पीडितेवर रिसॉर्टमध्ये झाला अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 10:00 IST2026-04-15T10:00:13+5:302026-04-15T10:00:37+5:30

TCS Case News: टीसीएस कंपनीतील महिला सहकाऱ्यांवर कथित लैंगिक अत्याचार व धर्मांतर प्रयत्न प्रकरणात  संशयितांकडून पीडितेवर रिसॉर्टमध्ये अत्याचार केले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

TCS case; Victim was tortured in resort | टीसीएस प्रकरण; पीडितेवर रिसॉर्टमध्ये झाला अत्याचार

टीसीएस प्रकरण; पीडितेवर रिसॉर्टमध्ये झाला अत्याचार

 नाशिक - टीसीएस कंपनीतील महिला सहकाऱ्यांवर कथित लैंगिक अत्याचार व धर्मांतर प्रयत्न प्रकरणात  संशयितांकडून पीडितेवर रिसॉर्टमध्ये अत्याचार केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये विशेष तपास पथकाने त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील एका रिसॉर्टमध्ये जाऊन सखोल चौकशी केली असून  सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. पंचनामा दरम्यान तपासासाठी महत्त्वाची माहिती मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.

कंपनीतील लॉबी व पॅन्ट्री भागाचीही तपासणी करून फॉरेन्सिक पुरावे गोळा केले आहेत. दरम्यान, देवळाली कॅम्प पोलिसांत पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडित महिलांना विश्वासात घेऊन  घटनाक्रम जाणून घेतला. पीडितेच्या तक्रारीनुसार, तिला टेकडीवर व रिसॉर्टमध्ये  नेऊन अत्याचार केला.

दुसरी संशयित महिला निदा खान अद्याप फरारच
या प्रकरणात ऑपरेशन मॅनेजर आश्विनी चैनानी हिच्यावरही संशय व्यक्त होत असून, आरोपींना ऑनड्यूटी असताना बाहेर जाण्यास मदत केली का, याबाबत तपास सुरू आहे.
दरम्यान, या गुन्ह्यातील दुसरी महिला संशयित निदा खान अद्याप फरार  आहे.  निदा हीच इतर आरोपींची सहकारी असून, ती मुलींना विशिष्ट धार्मिक पद्धतींचे प्रशिक्षण देत असल्याची माहिती पुढे आली आहे. तिचा शोध सुरू आहे.

Web Title : टीसीएस मामला: पीड़िता पर रिसॉर्ट में अत्याचार, जांच जारी।

Web Summary : टीसीएस कर्मचारी के साथ कथित तौर पर यौन उत्पीड़न और धर्म परिवर्तन का प्रयास। पुलिस ने त्र्यंबकेश्वर के पास एक रिसॉर्ट की जांच की, सीसीटीवी फुटेज जब्त किया। एक अन्य संदिग्ध, निदा खान फरार है, कथित तौर पर धार्मिक प्रशिक्षण में शामिल है। ऑपरेशन मैनेजर की भूमिका की जांच जारी है।

Web Title : TCS Case: Victim assaulted at resort; investigation underway.

Web Summary : A TCS employee was allegedly sexually assaulted and forced into religious conversion. Police investigated a resort near Trimbakeshwar, seizing CCTV footage. Another suspect, Nida Khan, remains at large, allegedly involved in religious training. Investigation ongoing into Operation Manager's role.