शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी वाहनातून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी कर

By admin | Updated: March 28, 2017 23:57 IST

सप्तशृंगगड : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी खासगी वाहनातून येणाऱ्या भाविकांवर यापुढे दरडोई दोन रुपये कर आकारला जाणार आहे.

सप्तशृंगगड : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी खासगी वाहनातून येणाऱ्या भाविकांवर यापुढे दरडोई दोन रुपये कर आकारला  जाणार आहे. आज, गुढीपाडव्यापासूनच टोल आकारणीला प्रारंभ करण्यात आला.सप्तशृंगगडावर येणाऱ्या भाविकांना नागरी सुविधा पुरविताना ग्रामपंचायतीला आर्थिक मर्यादा येत असून, उत्पन्नाचा स्रोत म्हणून भाविकांच्या वाहनांवर व भाविकांवर कर आकारण्याची मुभा मिळावी, अशी चर्चा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत झाली होती. याविषयी सप्तशृंगगड ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार केला होता. त्यामुळे हा निर्णय घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने कर आकारणीस मंजुरी दिली आहे. त्यानुसार व ग्रामपंचायतीने केलेल्या कार्यवाहीनुसार कर आकारणीबाबत अंमलबजावणी करण्याचे आदेश सप्तशृंगगड ग्रामपंचायतीला देण्यात आले. गडावर भगवतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ग्रामपंचायतीकडून नागरी मूलभूत सोयी सुविधा देताना वार्षिक उत्पन्न तुटपुंजे असल्याने अडचणी येतात तसेच सप्तशृंगीदेवी ट्रस्टकडूनही ग्रामपंचायतीला नागरी सुविधांसाठी आर्थिक मदत दिली जात नाही. शासनाकडून मिळणारा निधी अत्यल्प आहे.  त्यामुळे ग्रामपंचायतीकडून भाविकांना नागरी सोयी सुविधा देताना अल्प उत्पन्न आणि कमी उत्पन्न स्रोतामुळे सप्तशृंगगड ग्रामपंचायतीची आर्थिक ओढाताण होत असल्याने भाविकांकडून दरडोई दोन रु पये घेण्याचे ठरविले आहे. या कराच्या उतपन्नातून भाविकांकरिता सोयीसुविधा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची राहणार आहे. सार्वजनिक वाहन, एस.टी. बस, शासकीय वाहनातील प्रवासी तसेच अपंग व लहान मुले या करातून वगळण्यात येणार आहे. सप्तशृंगगडावर दररोज हजारो भाविक दर्शनासाठी व पर्यटनस्थळ म्हणून येथे येत असतात तसेच सुट्टीच्या काळात हीच गर्दी तिपटीने वाढत असते. त्यामुळे दरडोईचा कर हा नक्कीच सोयी  सुविधा पुरविण्यासाठी फायद्याचा ठरणार आहे़ (वार्ताहर)