शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

घुमला विक्रमी समूहस्वर

By admin | Updated: January 25, 2016 22:59 IST

घुमला विक्रमी समूहस्वर

नाशिक : अकरा हजार चिमुकल्यांच्या मुखातून ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा’ हे शब्द उमटले अन् सर्वच उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. शहरातील २७ शाळांमधील तब्बल अकरा हजार विद्यार्थ्यांनी एकाच वेळी आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशभक्तिपर गीतांचे गायन करीत विक्रम नोंदवला. झेप सामाजिक, सांस्कृतिक संस्थेच्या वतीने पंचवटीतील आर. पी. विद्यालयाच्या प्रांगणात हा दिमाखदार सोहळा पार पडला. गेल्या महिनाभरापासून या उपक्रमाची तयारी सुरू होती. भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल जोगिंदर जसवंत सिंह यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. आमदार निर्मला गावित, जयंत जाधव, महापौर अशोक मुर्तडक, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, माजी आमदार माणिकराव कोकाटे आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ संगीतकार श्रीकृष्ण चंद्रात्रे यांनी या उपक्रमाचे संचालन केले. भारताच्या मूळ राष्ट्रगीतातील प्रचलित नसलेली चार कडवी त्यांच्या चमूने सादर केली. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंगी टोप्या परिधान करणाऱ्या अकरा हजार विद्यार्थ्यांनी एकाच वेळी एका सुरात ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा’, ‘सारे जहॉँ से अच्छा’, ‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे’ आणि ‘भारत हमें प्यारा हैं’ या चार गीतांचे गायन करीत आगळा विक्रम नोंदवला. त्याला सर्वच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. सुहास खरे, राजन अग्रवाल (ढोलकी), हृषीकेश क्षीरसागर (तबला) व ज्ञानेश्वर कासार (संवादिनी) यांनी साथसंगत केली. दरम्यान, समूहगान झाल्यानंतर लगेचच ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया’ या संस्थेचे दिनेश पैठणकर यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा उपमहापौर गुरुमित बग्गा यांना विक्रम नोंदवल्याचे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान केले. प्रारंभी बग्गा यांनी उपक्रमाचा उद्देश समजावून सांगितला. बालवयातच मुलांच्या मनावर देशभक्तीचे संस्कार केल्यास त्यातून उत्तम नागरिक निर्माण होतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, शिक्षण सभापती संजय चव्हाण, नगरसेवक राहुल ढिकले, समाधान जाधव, विमल पाटील, रुची कुंभारकर, उद्धव निमसे, दामोदर मानकर आदिंसह पालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)