शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

ज्वार्डीतील तरुणाचा संशयास्पद मृत्यूा्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:14 IST

ग् रामस्थांचे ठिय्या : खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआझादनगर : तालुक्यातील ज्वार्डी येथील तरुणाच्या मृत्यू प्रकरणी त्याच्या नातेवाइकांवर ग्रामस्थांनी संशय व्यक्त केला असून, खुनाचा गुन्हा दाखल करून संशयित आरोपीस अटक करावी या मागणीसाठी सामान्य रुग्णालयासह उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले.तालुक्यातील ज्वार्डी येथील दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या रोशन तात्यासाहेब दैतकर या तरुणाचा मृतदेह रविवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजेदरम्यान निमगाव शिवारातील विहिरीत आढळून आला होता. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, मृताच्या आप्तेष्टांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी मृतदेहाची अवस्था पाहून मृतदेह न्यायवैद्यक तपासणीसाठी धुळे येथे पाठविण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले होते. पोलीस संशयितांना पाठीशी घालत मृतदेहाची अवहेलना करीत असल्याचा आरोप करीत ठिय्या रुग्णालयात काही काळ आंदोलन केले. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवून कार्यालयासमोर ठिय्या मांडला. शेवटी उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. मृतदेह न्यायवैद्यक तपासणीसाठी धुळे येथे पाठविण्यात आला. आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह विहिरी बाहेर काढू देणार नाही असा पवित्रा नातलगांनी घेतला त्यामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली. पोलिसांकडून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन वेळोवेळी देण्यात आले. मात्र याचा काही उपयोग झाला नाही.काही काळानंतर ग्रामस्थांनी शहर पोलीस नियंत्रण कक्षातील उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालय गाठून ठिय्या मांडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक (ग्रा.) शशिकांत शिंदे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी नियंत्रण कक्ष गाठून रोशनच्या नातलगांची व गावकऱ्यांशी चर्चा करून न्यायवैधक तपासणीसाठी मृतदेह धुळे येथे पाठवण्याचीविनंती केली. आम्ही संशयितांचा कसून शोध घेत असून, न्यायवैधक तपासणी अहवालानुसार त्वरित कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर दुपारी १ वाजता रोशनचा मृतदेह न्यायवैधक तपासणीसाठी धुळे येथे पाठवण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे करीत आहेत.रात्री १० वाजता गावकऱ्यांची मने वळविण्यात पोलिसांना यश आले. रात्री उशिरा मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. सोमवारी सकाळी डॉ. किशोर डांगे यांनी न्यायवैधक तपासणीसाठी धुळे येथे घेऊन जावा लागणार असल्याचे सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा शवगृहाबाहेरच ठिय्या मांडला.