शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

लासलगाव बाजार समितीकडून शेतकरी साठे यांचे समर्थन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 18:11 IST

कांदाप्रश्न : दीर्घकालीन उपाययोजनेची मागणी

ठळक मुद्देकांद्याचे बाजारभाव कमी झाले असून त्यातून लागवड खर्चही निघत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे, शासनाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी करत होळकर यांनी संजय साठे यांच्या कृतीचे समर्थन केले आहे.

लासलगाव : कांद्याच्या लिलावातून आलेली तुटपुंजी रक्कम मनीआॅर्डरने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविणारे नैताळे येथील शेतकरी संजय साठे चांगलेच चर्चेत आले असून लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी साठे यांचेशी चर्चा करून वस्तुस्थिती जाणून घेतली. कांद्याचे बाजारभाव कमी झाले असून त्यातून लागवड खर्चही निघत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे, शासनाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी करत होळकर यांनी संजय साठे यांच्या कृतीचे समर्थन केले आहे.होळकर यांनी सांगितले, लासलगाव बाजार समितीचे निफाड येथील उपबाजार आवारात नैताळेचे शेतकरी संजय बाळकृष्ण साठे यांनी दि. २९ नोव्हेंबर रोजी कांदा विक्र ीस आणलेला होता. सदर कांदा कमी दराने विक्र  झाला होता. सदर  कांदा खराब व हलका दर्जाचा असल्याबाबत बाजार समितीने शासनास कळविल्याची चुकीची चर्चा पसरवली जात आहे. वास्तविक बाजार समितीने कांदा खराब असल्याबाबतची कोणतीही माहिती शासनास पुरवलेली नसल्याचेही होळकर यांनी स्पष्ट केले आहे.कांद्याचे बाजारभाव कमी झालेले असून शेतकऱ्यांचा कांदा लागवड खर्च देखील निघत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यासाठी शासनाने कांद्यासाठी भावांतर योजना लागु करावी, कांद्याला ५०० रुपये प्रती क्विंटल अनुदान देण्यात यावे, इतर शेतीमालाप्रमाणे कांदा खरेदीदारांना ट्रान्झिट सबसिडी द्यावी, निर्यातसाठी प्रयत्न करणेसाठी शासन स्तरावर प्रयत्न करावे, किंमत स्थिरीकरण निधीचा वापर ग्राहकांबरोबर उत्पादकांसाठी करण्यात यावा, कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेच्या दरात वाढ करून सदर योजनेस दीर्घकाळ मुदतवाढ द्यावी आदी अनेक उपाययोजना शासनाला वेळोवेळी निवेदनाद्वारे सुचविलेल्या असल्याचेही जयदत्त होळकर यांनी म्हटले आहे.प्रस्ताव केंद्राला रवानाबाजार समितीने दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने जास्तीत जास्त कांदा निर्यात होणेसाठी कांदा निर्यातदारांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने कांदा निर्यात प्रोत्साहन योजना दीर्घकाळासाठी लागू करु न त्यात १० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात यावी, असा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राला पाठविलेला असल्याची माहितीही जयदत्त होळकर यांनी दिली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा