शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीचा मागणीपेक्षा पुरवठा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:13 IST

सिन्नर : कोरोना लसीचा प्रभाव लक्षात आल्यानंतर आणि आरोग्य विभागाकडून प्रबोधनानंतर नागरिक लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर गर्दी करीत आहेत. मात्र ...

सिन्नर : कोरोना लसीचा प्रभाव लक्षात आल्यानंतर आणि आरोग्य विभागाकडून प्रबोधनानंतर नागरिक लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर गर्दी करीत आहेत. मात्र मागणीच्या तुलनेत केवळ २५ टक्केच लसीचा पुरवठा होत असल्याचे लसीकरणात अडचणी निर्माण होत आहे. सिन्नरला दर आठवड्याला किमान दहा हजार लसीची गरज असताना केवळ दोन ते अडीच हजार डोस उपलब्ध होत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. अपुऱ्या पुरवठ्यामुळे प्रशासनासमोर अडचण निर्माण होत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगितले जात असल्याने प्रारंभी लसीकरणापासून चार हात दूर राहणारे नागरिक आता स्वतःहून कोरोना लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने अनेकदा लसीकरण बंद पडत आहेत. सिन्नर शहरातील ग्रामीण रुग्णालयात २, शिवाजीनगर येथे १ आणि नगरपालिका दवाखान्यात १ असे चार ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. तर ग्रामीण भागात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र, १२ आरोग्य उपकेंद्र अशा एकूण २२ केंद्रांवर कोरोनाचे लसीकरण सुरू आहे. दहा हजार लसींची गरज असताना केवळ दोन ते अडीच हजार डोस उपलब्ध होत आहे.