शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगाराचे प्राण वाचविण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 15:58 IST

सिडको परिसरातील कर्मयोगीनगरमधील रणभूमी क्रीकेट ग्राऊंडजवळ सुरू असलेल्या ड्रेनेज पाईपलाईनच्या नाल्यात पडून मातीच्या ढिगाऱ्या खाली अडकलेल्या कामगारास वाचविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना गुरुवारी (दि.५) यश आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने तब्बल अर्धातास चाललेल्या बचाव मोहीमेनंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर दिली आहे. 

ठळक मुद्देभूयारी गटारीच्या नाल्यात मातीकाल कामगार दबाल्याचा प्रकार स्थानिकांच्या मदतीने अग्नीशमन दलाने वाचविले प्राणअर्धा तासाच्या बचावकार्यानंतर कामगारास वाचविण्यात यश

नाशिक : सिडको परिसरातील कर्मयोगीनगरमधील रणभूमी क्रीकेट ग्राऊंडजवळ सुरू असलेल्या ड्रेनेज पाईपलाईनच्या नाल्यात पडून मातीच्या ढिगाऱ्या खाली अडकलेल्या कामगारास वाचविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना गुरुवारी (दि.५) यश आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने तब्बल अर्धातास चाललेल्या बचाव मोहीमेनंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर दिली आहे. कर्मयोगीन नगरमधील रणभूमी क्र ीकेट ग्राऊंडजवळ महानगर पालिकेच्या भूयारी गटार योजनेचे काम सुरू असून या ठिकाणी जेसीबीच्या साह्याने सुमारे १० ते १५ फूट खोल नाला खोदण्याचे काम सुरू आहे. या नाल्यात काही कामासाठी उतरलेला कामगार विकास टापरे  (५०)हा  अचानक  मातीचा ढिगारा कोसळल्याने माती खाली दाबला गेल्याने खळबळ उडाली. ही घटना समजताच परिसरातील स्थानिक  नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जेसीबीच्या मदतीने माती काढण्यास सुरुवात केली, त्याप्रमामे पोलीस नियंत्रण कक्षालाही घटनेची माहिती दिली. पोलीस नियंत्रण कक्षाने तत्काळ ही घटना अग्नीशमन दलाच्या सातपूर विभागीय कार्यालयास कळविली. सुमारे२ वाजून १८ मिनिटांनी घटनेची माहिती कळताच अग्नीशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहचून मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबल्या गेलेल्या विकास टापरे यास जेसीबी आणि स्थानिकांच्या मदतीने ५ ते सहा मिनिटांमध्येच  बाहेर काढले. परंतु, माती कोसळल्यापासून ते ढिगाºयाखालून बाहेर काढण्यापर्यंत तब्बल अर्धातास मातीच्या ढिगाºयाखाली असल्याने विकास टापरे बेशुद्ध झाला होता. अग्नीशमन दलाच्या जवानांनी त्याच्यावर प्रथमोपचार करून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचापासाठी दाखल केले असून त्याची प्रकृती स्थीर आहे. 

अग्नीशमन बंबातून रुग्णाला हलविले रुग्णालयात रणभूमी क्रीकेट मैनाजवळ घडलेल्या अपघात मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कर्मचाऱ्याला वाचविण्याच अग्नीशमन दलाला यश आले. मात्र त्याला रुग्णलायता दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेला संपर्कसाधूनही रुग्णवाहिका वेळेत पोहोचू शकली नाही. त्यामुळे अखेर अग्नीशमन दलाचे लिडींग फायरमन दिलीप दोंदे, वाहन चालक संजय तुपलोंढे, फायरमन अशोक मोरे, ताराचंद सूर्यवंशी व रमाकांत खारे यांनी मातीच्या ढिगाऱ्या खाली अडकून श्वास गुदमरलेल्या विकास टापरे यास प्रथमोपचार करून अग्नीशमन दलाच्या बंबातूनच जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. 

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिकfireआगhospitalहॉस्पिटल