शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीत भडका

By admin | Updated: October 9, 2015 00:15 IST

साधुग्राम स्वच्छता : ठेकेदारांची बिले अदा करण्यास आक्षेप

नाशिक : महापालिका प्रशासनाने वादग्रस्त ठरलेल्या साधुग्राम स्वच्छतेच्या ठेक्याची माहिती स्थायी समितीवर केवळ अवलोकनार्थ ठेवल्यानंतर अधिकारावरून भडका उडाला आणि स्थायीच्या सदस्यांनी आक्रमक होत प्रशासनाला प्रत्येक मुद्द्यावरून घेरले. प्रशासनही आयुक्तांनी केलेली कार्यवाही योग्य समजत आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. दरम्यान, सदस्यांनी जोपर्यंत साधुग्राम स्वच्छता ठेक्याप्रकरणी उच्च न्यायालय निर्णय देत नाही तोपर्यंत संबंधित ठेकेदारांची बिले अदा करण्यास आक्षेप घेतला. स्थायीला अधिकारच नसतील तर कुलूप ठोका, असे उद्वेगाने सांगत सदस्यांनी प्रशासनावर हुकूमशाहीचा आरोप केला. गेल्या तीन महिन्यांपासून साधुग्राम स्वच्छतेच्या ठेक्यावरून स्थायी समिती आणि प्रशासन यांच्यातील वाद धुमसत आहे. आता कुंभपर्वणी आटोपल्यानंतर संबंधित ठेकेदारांना बिले अदा करण्याची वेळ येऊन ठेपली तेव्हा प्रशासनाने आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात केलेली कार्यवाही माहितीस्तव स्थायी समितीवर ठेवली. त्यामुळे अधिकारावरून भडका उडाला आणि सदस्यांनी एकेक मुद्द्यांची उकल करत प्रशासनाला घेरण्याचा प्रयत्न केला. यशवंत निकुळे, प्रा. कुणाल वाघ, राहुल दिवे, संगीता गायकवाड, सुरेखा भोसले, नीलिमा आमले यांनी ठेक्यातील अटी-शर्ती आणि प्रशासनाकडून वेळोवेळी झालेली कार्यवाही याचा ऊहापोह करत स्थायीच्या अधिकाराचा मुद्दा उपस्थित केला. सदर ठेका देताना स्थानिक भूमिपुत्रांना डावलण्यात आले. प्रशासन जाणूनबुजून स्थायीच्या अधिकारात हस्तक्षेप करत असून, विकासकामांमध्ये खोडा घालत आहे. साधुग्राम स्वच्छता, घंटागाडी, पेस्ट कंट्रोल यासाठी एकाच ठेकेदारावर प्रशासनाची मेहेरनजर कशासाठी असा आरोप करत सदस्यांनी साधुग्राम स्वच्छतेच्या कामासाठी मंजुरी दिलेली नसतानाही प्रशासनाकडून दिशाभूल केली जात आहे.