शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची आजपासून एकाच वेळी चाचणी

By admin | Updated: April 6, 2017 00:33 IST

पेठ : राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या महत्त्वाकांक्षी प्रगत शैक्षणिक कार्यक्र मांतर्गत पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या द्वितीय सत्रातील लेखी परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत

 पेठ : विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या महत्त्वाकांक्षी प्रगत शैक्षणिक कार्यक्र मांतर्गत पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या द्वितीय सत्रातील लेखी परीक्षांच्या (संकलित मूल्यमापन चाचणी) तारखा जाहीर झाल्या आहेत. प्रथम भाषा विषयाची ६ एप्रिल, तर गणित विषयाची परीक्षा ७ एप्रिलला होणार आहे. एकाच वेळी राज्यातील एक कोटी ६० लाख विद्यार्थ्यांच्या चाचणी मूल्यमापनासाठी विद्या परिषदेने नियोजन केले आहे.महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेमार्फत (विद्या परिषद) राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाते. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्र मांतर्गत पायाभूत चाचण्या घेण्यासंदर्भात शिक्षण विभागाने निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रथम भाषेतील मराठी, उर्दू, इंग्रजी, हिंदी, गुजराती, सिंधी, कन्नड, तेलुगू अशा आठ भाषांसह गणित या दोन विषयांचे राज्यातील एक कोटी ६० लाख विद्यार्थ्यांचे एकाच वेळी मूल्यमापन केले जाणार आहे.यावर्षी जुलै महिन्यात राज्यातील विद्यार्थ्यांची एकाच वेळी कलचाचणी घेण्यात आली. मागील वर्षाचा अनुभव पाठीशी असल्याने विद्या परिषदेने प्राथमिक चाचणी, विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका सोडविण्याची क्षमता तपासणे उत्तरपत्रिकांचे विश्लेषणासह प्रश्नपत्रिकेला अंतिम स्वरूप देण्याची प्रक्रिया वेळेतच पूर्ण करण्यात आली आहे. राज्यातील सर्वाधिक मराठी विषयांच्या प्रश्नपत्रिका वाटपही सुरू झाले असल्याने प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग, माध्यमिक शिक्षण विभाग, महापालिका शिक्षण विभागांना प्रश्नपत्रिकांचे संच शाळा स्तरावर पोहोच करण्याचे नियोजन पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती विद्या परिषदेचे संचालक गोविंद नांदेडे यांनी दिली. (वार्ताहर)