शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण पथकाला धक्काबुक्की

By admin | Updated: March 2, 2016 22:56 IST

सिन्नर : कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा

 सिन्नर : अनधिकृत रसवंती गृह हटविण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करीत शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन महिन्यांपासून अनधिकृत अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यात येत आहे. गणेश पेठेतील अशोकनगर भागातील मोकळ्या जागेत असलेल्या रसवंतीगृह चालकास अतिक्रमण हटविण्याबाबत सूचना देण्यात आली होती. तथापि, त्यांनी तसे न केल्याने मंगळवारी सकाळी अतिक्रमण विरोधी पथक रसवंती गृहाचे अतिक्रमण हटविण्यासाठी गेले होते. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण हटविण्यास प्रारंभ केला असता रसवंतीगृह चालक राहूल गायकवाड याने त्यांना विरोध करत शिवीगाळ व दमबाजी करण्यास सुरुवात केल्याचे अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख रुपेन शिंदे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी राहूल गायकवाड व त्याचा मित्र व मयूर खालकर हा त्याठिकाणी आला. कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की करण्यास प्रारंभ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे अतिक्रमण निर्मुलन पथकास अतिक्रमण न हटविताच तेथून जाणे भाग पडले. शिंदे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी रसवंतीगृह चालक राहूल गायकवाड व मयूर खालकर या दोघांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)