The State Onion Growers Association is not closed | राज्य कांदा उत्पादकांच्या संघटनेचा बंद नाही

राज्य कांदा उत्पादकांच्या संघटनेचा बंद नाही

ठळक मुद्देभारत दिघोळे : थोडाच कांदा बाजार समित्यांमध्ये घेऊन जाण्याचे आवाहन

लासलगाव : महाराष्ट्रातील एकही बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद राहणार नाही, अशी माहिती कांदा उत्पादकांच्या संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली . केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी करून परदेशातील कांदा आयात करण्याचा आदेश काढून तसेच कांद्याचे किरकोळ साठी २ टनाचे आणि होलसेलसाठी २५ टनांचे स्टॉक लिमिटची मर्यादा घालून दिल्याने कांद्याचे दर घसरले आहे. परंतु दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर तसेच चाळीतील कांदा सडण्याचे प्रमाण वाढलेले असल्याने राज्यभरातील सर्व कांदा उत्पादकांनी आपला कांद्याची चांगली प्रतवारी करून अगदी थोडा थोडा कांदा बाजार समित्यांमध्ये घेऊन जायचा आहे, असे सांगितले. तसेच ह्यबंद, बंद, बंदह्ण अशाप्रकारे जो काही मेसेज राज्यभरात सोशल मीडियावर फिरत आहे. त्या मेसेजचा आणि महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा कुठलाही संबंध नाही बाजार समित्यांचे कामकाज बंद ठेवल्याने परत जेव्हा बाजार समित्या सुरू होतील तेव्हा कांद्याची एकदम आवक होऊन सरकारचा कांद्याचे भाव पाडण्याचा हेतू उलट सफल होईल.
कांद्याचे लिलाव रोजच्या रोज व सुरळीत पद्धतीनेच सुरू राहावे हीच महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची अधिकृत भूमिका आहे. फक्त कांदा उत्पादक बांधवांनी आपल्या जवळच्या किंवा सोयीच्या बाजार समित्यांमध्ये कांदा घेऊन जात असताना तो अगदी थोडा थोडा घेऊन जावा जेणेकरून बाजार समितीमध्ये कांद्याची एकदम आवक होणार नाही व सरकारला कांद्याचे दर पाडण्याचे जे काही षडयंत्र करायचे आहे ते यशस्वी नाही होणार महाराष्ट्रातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव सुरळीत सुरू राहतील याची राज्यभरातील सर्व कांदा उत्पादकांनी नोंद घेण्याबद्दल ते म्हणाले.

केंद्र सरकारच्या कांदा आयातीच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यभर मोठे आंदोलन करून विरोध केला जाईल. परंतु बाजार समित्यांचे कामकाज बंद राहणार नाही. पाकिस्तानने कांदा निर्यातबंदी केल्याने कांद्याची जागतिक बाजारपेठ काबीज करण्यासाठी भारताने कांदानिर्यात खुली करावी यासाठी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सोमवारी (दि.२६) ऑक्टोबर रोजी सर्व घटक जसे की मार्केट कमिटी सभापती, सचिव, व्यापारी हमाल, मापारी यांच्याशी चर्चा करतील. अशी माहितीही दिघोळे राज्य प्रवक्ते शैलेश पाटील, राज्य प्रवक्ते व वाखारी येथील शेतकरी संघटनेचे शिवाजीराव पवार यांनी दिली.

Web Title: The State Onion Growers Association is not closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.