प्रवीण पानपाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 06:21 PM2019-11-09T18:21:55+5:302019-11-09T18:22:30+5:30

वणी येथील के.आर.टी. हायस्कूलचे शिक्षक प्रवीण विजय पानपाटील यांना नुकतेच त्यांनी सादर केलेल्या संगणकाच्या साह्याने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजीचे अध्यापन सुलभ करणे व विविध मोबाइल अ‍ॅपच्या मदतीने विद्यार्थ्यांना आॅनलाइन गृहपाठ देऊन त्यांना स्वयंअध्ययन करण्यास प्रोत्साहित करणे या नवोपक्रमासाठी टीचर इनोव्हेशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

State level award to Praveen Panpatil | प्रवीण पानपाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार

वणी येथील प्रवीण पानपाटील यांना सोलापूर येथील सिंहगड इन्स्टिट्यूट येथे राष्ट्रीय एज्युकेशनल इनोव्हेशन कॉन्फरन्समध्ये टीचर इनोव्हेशन अवॉर्डने सन्मानित करताना मान्यवर.

googlenewsNext

पाथरे : वणी येथील के.आर.टी. हायस्कूलचे शिक्षक प्रवीण विजय पानपाटील यांना नुकतेच त्यांनी सादर केलेल्या संगणकाच्या साह्याने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजीचे अध्यापन सुलभ करणे व विविध मोबाइल अ‍ॅपच्या मदतीने विद्यार्थ्यांना आॅनलाइन गृहपाठ देऊन त्यांना स्वयंअध्ययन करण्यास प्रोत्साहित करणे या नवोपक्रमासाठी टीचर इनोव्हेशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र शासन, रवि जय मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आय.आय.एम.) अहमदाबाद, हनी बी व स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन (सर फाउंडेशन) सोलापूर यांच्यातर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगांच्या आधारावर राज्यातील सर्व उपक्रमशील शिक्षकांमधून ही निवड केली जाते. सोलापूर येथील सिंहगड इन्स्टिट्यूट येथे राष्ट्रीय एज्युकेशनल इनोव्हेशन कॉन्फरन्समध्ये हे पारितोषिक वितरण झाले.
यावेळी पुणे येथील बालभारतीचे अधिकारी डॉ. अजयकुमार लोळगे, पुणे येथील विद्या प्राधिकरणाच्या उपसंचालक शोभा खंदारे, अभय दिवाण, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू , एम.के.सी.एल.के.चे कार्यकारी संचालक विवेक सावंत, टी.सी.एम.चे मुख्य शास्त्रज्ञ विपुल शहा, उदय पाचपुते, अरु ण देशपांडे, गुजरात येथील शिक्षणतज्ज्ञ डॉ. भावेश पंड्या, एम.सी.ई.आर.टी. च्या गीतांजली बोरु डे, सर फाउंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ, हेमा शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रवीण पानपाटील यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, दिंडोरी व पेठ तालुका संचालक दत्तात्रय पाटील, मविप्र शिक्षण अधिकारी एस. के. शिंदे, शालेय समिती अध्यक्ष विलासराव कड यांनी कौतुक केले आहे.

Web Title: State level award to Praveen Panpatil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.