नोटा, नाणी यांचा समावेश असलेल्या रेअर फेअर प्रदर्शनास सुरुवात

By Admin | Updated: January 6, 2017 21:39 IST2017-01-06T21:39:37+5:302017-01-06T21:39:37+5:30

कलेक्टर्स सोसायटी ऑफ न्यूमिसमॅटिक अँड रेअर आयटम्स, नाशिक यांच्या तर्फे 'रेअर फेअर २०१७' या दुर्मिळ नोटा, नाणी, पोस्टाची तिकिटे तसेच शिवराई

Start of the Rare Fair exhibition involving notes, coins | नोटा, नाणी यांचा समावेश असलेल्या रेअर फेअर प्रदर्शनास सुरुवात

नोटा, नाणी यांचा समावेश असलेल्या रेअर फेअर प्रदर्शनास सुरुवात

>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 6 -  कलेक्टर्स सोसायटी ऑफ न्यूमिसमॅटिक अँड रेअर आयटम्स, नाशिक यांच्या तर्फे 'रेअर फेअर २०१७' या दुर्मिळ नोटा, नाणी, पोस्टाची तिकिटे तसेच शिवराई आणि इतर दुर्मिळ वस्तुंच्या प्रदर्शनाचे  आज नाशिकचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
या प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या विविध वस्तूंची खरेदी-विक्री तसेच लिलाव करण्यात येणार आहे. शुक्रवार  ते रविवार (दि.८) या कालावधीत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, या प्रदर्शनामुळे नागरिकांना त्यांचा संग्रह वाढविण्यास मदत तसेच नविन छंद जोपासण्याची आवड देखील यानिमित्ताने निर्माण होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Start of the Rare Fair exhibition involving notes, coins