शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांकडून कॉर्नर सभांना सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:09 IST

मविप्र संस्था निवडणूक

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजल्याने आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. एकाधिकारशाहीचा आरोप सरचिटणीस नीलिमा पवार यांच्यावर मविप्रचे सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केल्यानंतर त्यांना शहरात कॉर्नर सभा घेऊन श्रीमती नीलिमा पवार यांनी केलेल्या कामांची यादीच सादर करत प्रत्युत्तर दिले आहे.येत्या ३ आॅगस्टला प्रत्यक्षात सत्ताधारी पॅनलच्या नावाची घोषणा करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. गेल्या तीन चार दिवसांपासून श्रीमती पवार यांनी प्रभागनिहाय कॉर्नर सभांना सुरुवात केली आहे. शनिवारी (दि.१५) त्यांनी सातपूरला तर रविवारी (दि.१६) सिडकोत कॉर्नर सभा घेतली. सोमवारी (दि.१७) त्यांनी पंचवटीत कॉर्नर सभा घेतली. पुढील काही दिवसांत शहरातील मतदारांशी त्या अशाच प्रकारे संपर्क साधणार आहेत. रविवारीच मागील पंचवार्षिक निवडणुकीत विरोधी पॅनलचे नेतृत्व करणारे विद्यमान सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे व अध्यक्ष प्रताप सोनवणे यांनी सभासदांची सहविचार सभा घेऊन विरोधी पॅनलची निर्मिती करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सत्ताधारी पॅनलचे नेतृत्व पुन्हा एकदा नीलिमा पवार यांच्याबरोबरच मागील काळातील त्यांचे सहकारी संचालक करण्याची चिन्हे आहेत. त्यातही काही विद्यमान संचालकांना उमेदवारी नाकारून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या वर्तुळात आहे.