शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
2
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
7
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
11
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
12
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
13
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
14
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
15
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
16
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
17
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
18
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
19
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस सुरूच, सरासरीत वाढ

By admin | Updated: July 22, 2014 01:17 IST

खरिपाच्या पेरण्यांना वेग

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून पावसाने संततधार हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. तसेच त्र्यंबकेश्वर व इगतपुरीत पावसाचा जोर कायम असल्याने तेथील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यात जुलै महिन्याच्या सरासरीच्या १५ टक्के पावसाची हजेरी आतापर्यंत झाली आहे.सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ५१. १ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असली तरी सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच असल्याने पावसाच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी नोंदविण्यात आलेल्या ५१.१ मिलिमीटर पावसाच्या हजेरीत सर्वाधिक हजेरी इगतपुरी-१९, पेठ-१५, त्र्यंबकेश्वर-९, दिंडोरी-३ व अन्य तालुक्यांत अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम पट्ट्यात झालेल्या दमदार पावसामुळे मात्र भात व नागलीच्या रोपांना जीवदान मिळाले असून, जळण्याच्या मार्गावर असलेल्या या दोन्ही रोपांसह भुईमुगालाही काही प्रमाणात संजीवनी मिळाली आहे. मात्र पाऊस उशिराने सुरू झाल्याने ही तीनही पिकांचे पश्चिमपट्ट्यात ५० टक्केच उत्पादन होणार असल्याचे शेतकरी सांगतात. जिल्ह्याचे खरिपाचे एकूण सहा लाख ३४ हजार ६०० हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत त्यापैकी २९ हजार हेक्टर (४ टक्के) क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत.पावसाचा असाच जोर पश्चिमपट्ट्यासह पूर्वभागात वाढल्यास खरिपाच्या पेरण्यांना गती येण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)