जिल्ह्यातील ५९ शेतकऱ्यांना सौर कृषिपंप

By Admin | Updated: April 10, 2017 01:40 IST2017-04-10T01:40:14+5:302017-04-10T01:40:26+5:30

नाशिक : महावितरणने सुरू केलेल्या सौर कृषिपंप योजनेला चांगला प्रतिसाद लाभला असून, जिल्ह्यातील ५९ शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेचा वापर सुरू केला आहे.

Solar farming in 59 districts of the district | जिल्ह्यातील ५९ शेतकऱ्यांना सौर कृषिपंप

जिल्ह्यातील ५९ शेतकऱ्यांना सौर कृषिपंप

 नाशिक : ज्यांच्यापर्यंत अद्याप वीज पोहचलेली नाही अशा शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेवर कृषिपंप चालवावे यासाठी महावितरणने सुरू केलेल्या सौर कृषिपंप योजनेला चांगला प्रतिसाद लाभला असून, जिल्ह्यातील ५९ शेतकऱ्यांनी विजेवर अवलंबून न राहता सौर ऊर्जेचा वापर सुरू केला आहे.
सौर कृषिपंप योजनेला नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, आतापर्यंत ५९ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत सौर पंपावर सिंचन करण्यास सुरु वात केली आहे. यात सर्वाधिक १३ शेतकरी सिन्नर तालुक्यातील आहेत. ज्यांच्या शेतात आतापर्यंत वीज पोहचू शकली नाही, अशा शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य सरकार ही योजना राबवित आहे.
पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण न झालेल्या शेतकऱ्यांनाही सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने सौर कृषिपंप योजना सुरू केली. अतिदुर्गम भाग, कोटेशन भरूनही तांत्रिक कारणामुळे तसेच वन विभागाकडून ना हरकत मिळत नसल्याने वीजजोडणी न मिळणे कठीण होते. जिल्ह्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती ही त्यांच्याकडे आलेल्या अर्जामधून पात्रता व प्राधान्यक्र मानुसार लाभार्थ्यांची निवड करीत असते.
गेल्या आर्थिक वर्षात सौर कृषिपंप योजनेतून नाशिक जिल्ह्यातील १३० लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या योजनेत सहभागी होण्यासाठी ऐकून २०३ जणांनी अर्ज केले. जिल्हास्तरीय समितीने यातील १३० लाभार्थ्यांची निवड केली. निवड झालेल्या लाभार्थ्यांपैकी ७९ जणांनी त्यांचा लाभार्थी हिस्सा जमा केला. त्यानुसार ७९ सौर कृषिपंपाची मागणी नोंदवण्यात आली. यातील ५९ शेतकऱ्यांच्या शेतात सध्या या योजनेतून सौर कृषिपंप बसवण्यात आले असून, सिंचनासाठी त्यांचा वापरही सुरू झाला आहे. तालुकानिहाय या योजनेतून सध्या कार्यरत सौरपंपांची संख्या - देवळा - ५, चांदवड - ५, नांदगाव - २, येवला - ६, इगतपुरी -४ सिन्नर - १३, पेठ- ४, सुरगणा- १०, त्र्यंबक- ६, निफाड- ४, मालेगाव- १ याप्रमाणे आहे.
मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी सौर कृषिपंपाची नुकतीच पाहणी केली. यावेळी नाशिक शहर मंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता अभिमन्यू चव्हाण, उप कार्यकारी अभियंता डॉ. नीलेश रोहणकर, कनिष्ठ अभियंता राहुल शिंदे आदि उपस्थित होते.

Web Title: Solar farming in 59 districts of the district