शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

समाजकल्याणने शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईनचा आग्रह सोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 15:47 IST

केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गंत सन २०१७-१८ मधील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षासाठी नुतनीकरण अर्ज व सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी नवीन आॅफलाईन अर्ज भरण्याच्या सुचना यापुर्वीच समाजकल्याण विभागाने सर्व महाविद्यालयांना दिल्या

ठळक मुद्देआॅफलाईन अर्ज करण्याचे आवाहन : दोन दिवसांची मुदतचालु आर्थिक वर्ष संपण्यास पंधरा दिवस शिल्लक आहेत

नाशिक : गेल्या वर्षी शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईनचा आग्रह धरल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवणाऱ्या समाजकल्याण विभागाने त्यापासून बोध घेत यंदा विद्यार्थी व महाविद्यालयांना आॅफलाईन अर्ज सादर करण्याच्या सुचना दिल्या असून, आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यासाठी अवघे पंधरा दिवस शिल्लक असल्याचे पाहून येत्या दोन दिवसात तातडीने अर्ज सादर करण्याची मुदत दिली आहे.केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गंत सन २०१७-१८ मधील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षासाठी नुतनीकरण अर्ज व सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी नवीन आॅफलाईन अर्ज भरण्याच्या सुचना यापुर्वीच समाजकल्याण विभागाने सर्व महाविद्यालयांना दिल्या होत्या, परंतु सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे बहुतांशाी महाविद्यालयांनी फक्त नुतनीकरणाचेच अर्ज दाखल केले आहेत. सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी नवीन नुतनीकरणाचे आॅफलाईन अर्ज काही महाविद्यालयांनी सादर केले नाहीत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांनी १६ मार्च पुर्वी नवीन व नुतनीकरणाचे आॅफलाईन अर्ज समाजकल्याण विभागाकडे पाठवावेत असे आवाहन सहाय्यक समाजकल्याण आयुक्त प्राची वाजे यांनी केले आहे. चालु आर्थिक वर्ष संपण्यास पंधरा दिवस शिल्लक आहेत. सन २०१७-१८ या शौक्षणिक वर्षामध्ये शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क योजनेंतर्गंत लाभ अदा करण्यासाठी सुधारित कार्यपद्धती शासनाने जानेवारीत काढलेल्या आदेशात नमूद असून, त्यानुसार विजाभज, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या केंद्र व राज्य योजनांमधील शंभर टक्के निधी विद्यार्थ्यांना मंजूर करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. जानेवारीच्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती प्रवर्गाचे सन २०१७-१८ मधील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षांचे नुतनीकरण अर्ज आॅनलाईन प्रणालीद्वारे त्या त्या महाविद्यालयांनी आॅनलाईन पद्धतीने आणि सन २०१७-१८ मधील नवीन आॅफलाईन अर्ज विहीत नमुन्यात अचूक माहितीसह सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार १६ मार्च पुर्वी महाविद्यालयांनी सदरचे अर्ज सादर करावेत त्यानंतर कोणतेही अर्ज स्विकारले जाणार नाहीत असेही वाजे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :SchoolशाळाNashikनाशिक