शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
2
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
5
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
6
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
7
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
8
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
9
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
10
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
11
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
12
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
13
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
14
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
15
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
16
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
17
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
18
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
19
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
20
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

...तर अधिवेशन बंद पाडू!

By admin | Updated: November 22, 2014 00:13 IST

पीक विमा योजना बदला : आजी-माजी विरोधी पक्षनेत्यांनी दिला राज्य सरकारला इशारा

नाशिक : अवकाळी पावसामुळे नाशिकसह राज्यभरात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी आत्महत्त्या करीत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येचे पाप घेण्यापेक्षा राज्य सरकारने आठ दिवसांत तत्काळ मदत जाहीर करावी, अन्यथा शिवसेना आगामी हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही. प्रसंगी रस्त्यावर उतरून मंत्र्यांना अधिवेशनाला बंदी घालू, असा इशारा विरोधी पक्षनेते आमदार एकनाथ शिंदे व माजी विरोधी पक्षनेते आमदार रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत दिला.
विरोधी पक्षनेत्यांनी शुक्रवारी (दि. २१) माडसांगवी, ओझर व खडकजांब या गावांना भेटी देऊन अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रीय पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या हिताची नव्हे, तर विमा कंपनीच्या सोयीची आहे. अडीच लाखांच्या पीक विम्याला नऊ हजार रुपये शेतकऱ्यांकडून घेतले जातात. पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांची लूट होत असून, शेतकऱ्यांना कवडीचा लाभ झालेला नाही. मराठवाड्यात पीक विमा योजनेत ३२ कोटी जमा झाले; मात्र शेतकऱ्यांना एक रुपयाचे नुकसान होऊ दिलेले नाही. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती असलेली नगदी पिके गेली आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ आठ दिवसांच्या आत राज्य सरकारने मदत जाहीर न केल्यास शिवसेना आगामी हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही. प्रसंगी रस्त्यावर उतरून मंत्र्यांना अधिवेशनास उपस्थित राहू देणार नाही. नुकसानीमुळे बागलाण व देवघट येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत. आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या तर त्याला थेट मुख्यमंत्री व सचिवांना जबाबदार धरून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस आपणच केली होती? मग आता तुमच्यावरही खुनाचा गुन्हा दाखल करणार काय, असा सवाल रामदास कदम यांनी केला. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोरडवाहू शेतीसाठी एकरी २५ हजार, बागायतीसाठी ५० हजार, तर फळबागांसाठी एकरी एक लाख मदत जाहीर करावी. आठ दिवसांत शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली नाही, तर शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्र फडणवीस यांना खुर्चीत बसू देणार नाही, असेही आमदार शिंदे व कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)