शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीच्या सायकली पडल्या बेवारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 00:13 IST

नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीचा शेअर बायसिकलिंग प्रकल्प गुंडाळल्यानंतर आता या सायकली ठिकठिकाणी बेवारस स्थितीत पडलेल्या दिसत आहेत. काही ठिकाणी तर त्यांचे नुकसानदेखील केले जात आहे. त्यामुळे लक्षावधीची गुंतवणूक अशी वाऱ्यावर सोडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीचा शेअर बायसिकलिंग प्रकल्प गुंडाळल्यानंतर आता या सायकली ठिकठिकाणी बेवारस स्थितीत पडलेल्या दिसत आहेत. काही ठिकाणी तर त्यांचे नुकसानदेखील केले जात आहे. त्यामुळे लक्षावधीची गुंतवणूक अशी वाऱ्यावर सोडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सुमारे दीड वर्षापूर्वी हा प्रकल्प राबविण्यात आला होता. एका खासगी कंपनीच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविताना स्मार्ट सिटी कंपनी किंवा नाशिक महापालिकेला त्याचा कोणत्याही प्रकारचा फायदा झाला नसला तरी पर्यावरणस्नेही शहर म्हणून त्याचा वापर केला जात होता. कंपनीने सुरुवातीला शंभर सायकलींवरून सुरुवात केली. परंतु नंतर मात्र त्याला प्रतिसाद वाढत गेला. त्यामुळे शहरात सायकलींचे शंभर स्टॅँड आणि एक हजार सायकली आणण्यात आल्या होत्या.ठेकेदाराने इलेक्ट्रीकल सायकलीदेखील आणल्या होत्या. त्यानंतर गेल्या पावसाळ्यात नागरिकांचा प्रतिसाद कमी झाला आणि प्रकल्पाला घरघर लागली. आता तर हा प्रकल्पच गुंडाळला गेला आहे. स्मार्ट सिटी कंपनीने ठेकाच टर्मिनेट केला आहे आणि आता हा प्रकल्प बंद पडला आहे.----------------------नोटिसीकडे दुर्लक्षमहापालिकेने नोटिसा दिल्यानंतरदेखील संबंधितांनी सायकली गोळा केल्या नाहीच उलटपक्षी आता स्मार्ट सिटी कंपनीवर या सायकली उचलण्याची वेळ आली आहे. या सायकली शहरातील विविध भागात पडून आहेत. काही सायकलींचे सीट गायब तर कुठे चाकेच गायब. काही स्टँडवरून सायकली चोरीस गेल्या आहेत काही ठिकाणी पोलिसांनी रस्ते बंद करताना बॅरिकेड म्हणून त्याचा वापर केला आहे. सायकलींची आणखी दुरवस्था होण्याची होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या सायकली वाचविण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक