शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

वाचनाची गती मंद; निवडणुकीची मात्र धुंद

By admin | Updated: April 1, 2017 01:14 IST

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीसाठी ४३ उमेदवार रिंगणात असून, त्यापैकी २२ उमेदवारांनी सार्वजनिक वाचनालयात पुस्तकाची देवाण घेवाण करण्यासाठी वाचनालयाचा उंबरा झिजवला नसल्याचे समोर आले आहे.

स्वप्निल जोशी : नाशिकसार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीसाठी ४३ उमेदवार रिंगणात असून, ज्या वाचनालयाची निवडणूक आहे जिथे वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी उमेदवारांकडून वेगवेगळी आश्वासने देण्यात येतात आणि जागर केला जातो आणि निवडणुकीनंतर हे उमेदवार जी जबाबदारी घेऊ पाहणार आहे त्यापैकी २२ उमेदवारांनी सार्वजनिक वाचनालयात पुस्तकाची देवाण घेवाण करण्यासाठी वाचनालयाचा उंबरा झिजवला नसल्याचे वाचनालयाकडे उपलब्ध असलेल्या माहितीतून समोर आले आहे. काही उमेदवारांची दोन वर्षाची तर काही उमेदवारांच्या वर्षभरातील नोंदींचा यात समावेश करण्यात आला आहे. सार्वजनिक वाचनालयाची निवडणूक रविवारी (दि. २) होणार असून, यासाठी ग्रंथमित्र पॅनल, जनस्थान पॅनल, परिवर्तन पॅनल यासह अपक्ष उमेदवार सावानाच्या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर वाचनालयाचे स्मार्ट कार्ड काढल्याचेही यानिमित्ताने समोर आले आहे, तर काही उमेदवारांच्या नातेवाइकांकडूनच वाचनालयाचा सर्रास वापर केला जात आहे. अनेक उमेदवारांच्या घरी समृद्ध ग्रंथसंपदा असल्याचेही यानिमित्ताने पुढे आले आहे. विविध पॅनलकडून वाचनालयातील विविध विभागांचे आधुनिकीकरण करणे, सावानाच्या संकेतस्थळावर वाचनालयातील पुस्तकांबाबत माहिती प्रकाशित करणे, सभासदांपर्यंत वाचनालयाने पोहोचणे, ई-वाचन पद्धती उपलब्ध करणे, पेटी पुस्तक योजना सुरू करणे आदि घोषणा करण्यात आल्या असल्या तरी याच घोषणा करणाऱ्या उमेदवारांनी वाचनालयात येऊन पुस्तकांची देवाण घेवाणच केली नसेल तर ते आपल्या वचननाम्यातील किती गोष्टींची पूतर्ता करतील याबाबत कल्पना न केलेलीच बरी. निवडणुकीआधी विविध मुद्द्यांनी सावाना चर्चेत आलेले असताना निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरसुद्धा चर्चेत आहे. उमेदवारांनी आपल्यालाच मतदान करावे यासाठी अनेक क्लृप्त्या लढविण्यात आल्या. वैयक्तिक गाठीभेटींबरोबरच मेसेजेस, व्हॉट्स अ‍ॅप, सोशल माध्यमांतून होणारा प्रचार कमी की काय म्हणून स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींप्रमाणेच सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीत जेवणावळीदेखील उठल्या. निवडणूक काळात प्रत्येक उमेदवारानी वेगवेगळी आश्वासने देऊन विजयाचा दावा केला असला तरी ज्या उमेदवारांनी कित्येक वर्षांपासून पुस्तकेच वाचली नसतील त्यांना निवडून द्यावे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.कोणी किती पुस्तके वाचली ?उमेदवार पुस्तक संख्यामकरंद सुखात्मे२२०मंदार क्षेमकल्याणी५४संजय येवलेकर४५सुनेत्रा महाजन२२हेमंत राऊत२१भालचंद्र वाघ१५सतीश महाजन१३नंदन रहाणे११शरदचंद्र दाते११रमेश जुन्नरे८विलास औरंगाबादकर७सुरेश गायधनी७अमित शिंगणे६