शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

स्वावलंबनासाठी कौशल्य विकास

By admin | Updated: April 11, 2017 01:04 IST

कायमस्वरुपी नोकऱ्या हा विषय आज हद्दपार झाला आहे. सरकारी नोकऱ्यांचे प्रमाणही कमी झाले आहे.

पुरवठा खात्याची कारवाई : अनेक बनावट दस्तावेज जप्तनाशिक : रेशन कार्डासहीत राष्ट्रीयत्व, वय व अधिवास, जन्म-मृत्यूची नोंदणी यांसह विविध बनावट शासकीय दाखले देणाऱ्या पंचवटीतील एका दुकानावर सोमवारी शहर धान्य वितरण अधिकारी गणेश राठोड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी अचानक छापा मारला असता, मोठे घबाड हाती लागले. अनेक शासकीय अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीचे दाखले तसेच शहर व जिल्ह्यातील शाळा सोडल्याचे कोरे दाखलेही या ठिकाणी सापडले आहेत. पंचवटी महाविद्यालयानजिकच्या श्री जी लॉजिंग जवळील एका सेतू केंद्राच्या बाजूला असलेल्या अग्रवाल असोसिएट्स नामक दुकानात रेशन कार्ड तयार करून मिळत असल्याची कुणकुण धान्य वितरण अधिकारी गणेश राठोड यांना लागली होती.  त्यानुसार सोमवारी दुपारी पुरवठा निरीक्षक डेबे, नायब तहसीलदार शेवाळे आदिंच्या पथकाने या दुकानावर अचानक छापा मारला असता, याठिकाणी अनेक महत्त्वाचे दस्तावेज आढळून आले. सदरचे दुकान प्रमोद नार्वेकर याचे असल्याचे व त्याच्याकडे एजंट म्हणून हरिश्चंद्र रामचंद्र अग्रवाल काम करीत होता. हे दोघेही रेशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, वय व अधिवास, राष्ट्रीयत्व, शिधापत्रिकेतून नाव वगळणे आदि प्रकारचे बनावट दाखले तयार करीत होते. या ठिकाणी जवळपास शंभर रेशन कार्ड सापडले असून, काही रेशनकार्ड तयार करण्यात आल्याचे व त्यावर महसूल खात्याच्या अनेक अधिकाऱ्यांची बनावट सही, शिक्क्याचा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर जातीचे दहा दाखले, नाशिक महापालिकेकडून देण्यात येणारे जन्म-मृत्यूचे दाखले, नाशिक शहरातील के. जे. मेहता, कोठारी कन्या, पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल, जनता विद्यालय, गांधीनगर, जु. स. रुंग्टा, चाळीसगाव तालुक्यातील आडगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे शाळा सोडल्याचे कोरे दाखलेही सापडले आहेत. विविध रकमेचे कोरे स्टॅम्प पेपरही याठिकाणी सापडल्याने झडती सत्र आटोपल्यानंतर पथकाने सर्व दाखले व साहित्य ताब्यात घेऊन पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली. रात्री उशिरा हरिश्चंद्र अग्रवाल व प्रमोद नार्वेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)गुन्ह्याची राज्यव्यापी व्याप्ती या धाडसत्रात ठाणे जिल्ह्यातील वाडा येथील तहसीलदारांचे रेशन कार्डावरील नाव कमी केल्याचे दाखले तसेच शिधावाटप नियंत्रण समितीच्या ठाणे व मुंबई येथील कार्यालयाचेही नाव कमी केल्याचे दाखले हाती लागल्याने राज्यातील अन्यत्र भागातीलही बनावट दाखले या ठिकाणाहून दिले जात असल्याचा संशय आहे. शिवाय सापडलेले अनेक रेशन कार्डचीदेखील बनावट छपाई करण्यात आली असून, त्याची खात्री करण्यासाठी रेशन कार्डावरील क्रमांक तपासून पाहण्यात आले आहेत.