शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

साठ टक्के महिला मतदारांचे मतदान

By admin | Updated: February 22, 2017 22:57 IST

मनपा निवडणूक : पुरुषांच्या बरोबरीने बजावला हक्क

नाशिक : महापालिका निवडणुकीत महिलावर्गाने मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडत मतदानाचा हक्क बजावला. यंदा ६०.५४ टक्के महिलांनी मतदान करत लोकशाहीच्या बळकटीकरणाला हात दिला, तर ६२.५२ टक्के पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला.नाशिक : महानगरपालिका निवडणुकीसाठी यंदा १० लाख ७३ हजार ४०७ मतदार होते. त्यात पुरुष मतदारांची संख्या ५ लाख ७० हजार ६९९, तर स्त्री मतदारांची संख्या ५ लाख २ हजार ६३७ इतकी होती. निवडणुकीत एकूण ६ लाख ६१ हजार १९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात ३ लाख ५६ हजार ८५५ पुरुष, तर ३ लाख ४ हजार ३४१ स्त्री मतदारांचा समावेश होता. एकूण मतांची टक्केवारी ६१.६० टक्के राहिली. मतदानासाठी महिला वर्गाचा लक्षणीय सहभाग दिसून आला. ६०.५४ टक्के महिलांनी घराबाहेर पडत राष्ट्रीय कर्तव्य बजावले. यंदा मतदान करणाऱ्या मतदारांच्या संख्येत तब्बल ८७ हजार ६१८ मतदारांची भर पडली. सन २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत १० लाख ३ हजार मतदारांपैकी ५ लाख ७३ हजार ५८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यंदा १० लाख ७३ हजार ४८७ मतदारांपैकी तब्बल ६ लाख ६१ हजार १९९ मतदारांनी मतदान केले. यंदा ७० हजार नवमतदारांनी मतदार म्हणून नोंदणी केली होती. मतदानाच्या दिवशी नवमतदारांमध्येही मोठा उत्साह दिसून आला. त्यामुळे मतांचा टक्का वाढण्यास मदत झाली. तीनच तृतीयपंथीयांचे मतदानमहापालिका निवडणुकीसाठी ७२ तृतीयपंथी मतदार होते. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी नाशिक लोकसभा मतदारसंघात ५० तृतीयपंथी मतदार होते. परंतु त्यातील केवळ दोहोंनीच मतदानाचा हक्क बजावला होता. यंदा प्रथमच महापालिका निवडणुकीसाठी मतदान करणाऱ्या तृतीयपंथीयांचा लक्षणीय सहभाग असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु ७२ पैकी केवळ तीनच तृतीयपंथी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये प्रभाग ९, प्रभाग १० आणि प्रभाग २७ मधील प्रत्येकी एक तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे.