बिबट्याने केल्या सहा शेळ्या फस्त

By Admin | Updated: March 30, 2017 23:46 IST2017-03-30T23:45:56+5:302017-03-30T23:46:12+5:30

निफाड : कारसूळ येथील रौळस रोडवरील एका वस्तीवर बिबट्याने सहा शेळ्या फस्त केल्याची घटना गुरुवारी (दि. ३०) घडली.

Six goats made by leopard | बिबट्याने केल्या सहा शेळ्या फस्त

बिबट्याने केल्या सहा शेळ्या फस्त


पिंपळगाव बसवंत/निफाड : कारसूळ येथील रौळस रोडवरील एका वस्तीवर बिबट्याने सहा शेळ्या फस्त केल्याची घटना गुरुवारी (दि. ३०) घडली.
कारसूळ येथील द्राक्ष बागेतील मजूर राजेश भंडारे याने सहा शेळ्या पाळलेल्या होत्या. गुरुवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास सर्व शेळ्या मृत असल्याचे आढळून आले. यापैकी काही गंभीर जखमी झालेल्या होत्या. एका शेळीवर पशुवैद्यकीय अधिकारी राजेंद्र केदार यांनी उपचार केले. या शेळीचाही मृत्यू झाला. वनविभागाचे येवला वनपरिक्षेत्र अधिकारी बी.आर. ढाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अधिकारी विजय टेकनर, भय्या शेख, दत्तू आहेर, संजय दाणे, भारत माळी यांनी घटनास्थळी येऊन परिसराची पाहणी केली.
टेकनर यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी पंचनामा केला. शेतमजूर राजेश भंडारे यांचे सुमारे तीस ते पस्तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. बिबट्याला शेळ्या बांधलेल्या असल्याने ओढता न आल्याने ऐका शेळीचा फडशा पाडण्यासाठी तत्याने पाच शेळ्या मारल्या. गेल्या वर्षीही याच वेळी या भागात एका बिबट्याने परिसरात दहशत निर्माण केली होती. (वार्ताहर)

Web Title: Six goats made by leopard