दोघा चोरट्यांकडून सहा दुचाकी हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:40 IST2020-12-04T04:40:29+5:302020-12-04T04:40:29+5:30

रावसाहेब कांबळे, प्रवीण काकड, भाऊसाहेब टिळे, शांताराम घुगे, विशाल आव्हाड, इम्रान पटेल यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मनमाड परिसरातून ...

Six bikes seized from two thieves | दोघा चोरट्यांकडून सहा दुचाकी हस्तगत

दोघा चोरट्यांकडून सहा दुचाकी हस्तगत

रावसाहेब कांबळे, प्रवीण काकड, भाऊसाहेब टिळे, शांताराम घुगे, विशाल आव्हाड, इम्रान पटेल यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मनमाड परिसरातून राजू पंडित अहिरे (२७, रा. आंबेडकर चौक, मनमाड) तसेच येवला शहरातून नवाजीश अकिल शेख (२१, रा. मोमीनपुरा, येवला) यांना सापळा रचून ताब्यात घेतले. तपासात त्यांनी येवला शहर व मालेगावकॅम्प येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. सदर संशयित आरोपींच्या ताब्यातून एक लाख सहा हजार रुपये किमतीच्या चोरीच्या सहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.

===Photopath===

031220\03nsk_29_03122020_13.jpg

===Caption===

येवला येथे ग्रामीण पोलीस पथकाने जेरबंद केलेले दोन चोरट्यांसह त्यांच्याकडूनहस्तगत केलेल्या दुचाकी.०३ येवला २

Web Title: Six bikes seized from two thieves