शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावच्या रस्त्यांना साइडपट्ट्यांची अडचण

By admin | Updated: July 17, 2017 00:51 IST

ंमालेगाव कॅम्प : मालेगाव शहरातील मुख्य रस्त्यावरील साइडपट्ट्यांचे काम गेल्या अनेक दिवसांपासून खोळंबले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कंमालेगाव कॅम्प : मालेगाव शहरातील मुख्य रस्त्यावरील साइडपट्ट्यांचे काम गेल्या अनेक दिवसांपासून खोळंबले आहे. रस्त्याच्या कडेला खड्डे खोदून त्यामध्ये माती मुरूम टाकून वर खडी टाकण्यात आली. परंतु अद्याप अनेक ठिकाणांवरील साइडपट्ट्या पूर्ण न झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शहरातील अनेक मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील लहानमोठे खड्डे शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. यात मुख्यते कॅम्प रस्ता व सटाणा रस्ता. या ठिकाणी गेल्या अडीच-तीन महिन्यांपूर्वी रस्ता रुंदीकरण करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला सहा फूट रुंद व एक-दीड फुटाहून अधिक खोलीच्या चाऱ्या खोदण्यात आल्या. या दोन्ही रस्त्यांवरील काही ठिकाणांवर या चाऱ्यांचे काम अंशत: पूर्ण झाले आहे. अनेक ठिकाणी काम संथगतीने, तर काही भागांत काम ठप्प झाले आहे.  येथील सटाणा रस्त्यावरील मोसमपूल चौक ते पुढे वैद्य हॉस्पिटलपर्यंत काही भागात या खोदलेल्या चारीमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून लहानमोठ्या आकाराची खडी टाकण्यात आली आहे. यामुळे येथे ये-जा करणारे व रस्त्यावरील व्यापारी संकुलमधील अनेक व्यापारी ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत कोठे तक्रार करावी याबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या दुकानांपुढे चारीसाठीची खडी, वाळू टाकल्याने नियमित येणारे ग्राहक व त्यांच्या वाहनांची गर्दी यामुळे सर्वांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.  सध्या सटाणा रस्त्यावर मोसमपूल ते लोढा मार्केट परिसरातील रस्त्यावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांतर्फे रस्त्याच्या मध्यभागी लोखंडी जाळ्या उभ्या करीत दुभाजक टाकून वाहतूक नियमित करण्याचा केविलवाणा प्रकार सुरू केला आहे. यात रखडलेल्या साइडपट्ट्यांचे काम ग्राहकांची व वाहनांची गर्दी व रस्त्यावरील मोठे झालेले खड्डे यामुळे वाहतुकीचा अधिक खोळंबा होत आहे. या ठिकाणी मालेगावहून गुजरात सटाण्याकडे जाणाऱ्या बसेसचा थांबा असल्याने वाहतुकीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. साइडपट्ट्यांचे काम पूर्ण होऊन डांबरीकरण झाले आहे त्या भागात रिक्षा व इतर वाहनांचे वाहनतळाचे अतिक्रमण झाले आहे. यामुळेदेखील वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे साइडपट्ट्यांचे काम व रस्त्यांची दुरवस्था यावर मनपाकडून कारवाईची मागणी होत आहे.