शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

गोदाकाठ परिसरात शेतमजुरांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 18:25 IST

चांदोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे शेतीक्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक शेतमजूर आपल्या गावी परतू लागल्यामुळे शेतीच्या कामासाठी मजुरांचा तुटवडा जाणवू लागल्याचे चित्र गोदाकाठ परिसरात पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देनिर्बंधांचा फटका : अनेक मजूर गावाकडे परतले

चांदोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे शेतीक्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक शेतमजूर आपल्या गावी परतू लागल्यामुळे शेतीच्या कामासाठी मजुरांचा तुटवडा जाणवू लागल्याचे चित्र गोदाकाठ परिसरात पाहायला मिळत आहे.कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. बारमाही बागायत पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातही कोरोनाचे मोठ्या प्रमाणात संक्रमण होत आहे. त्यामुळे अनेक निर्बंध लागू केले आहे. गेल्यावेळीही लॉकडाऊन लावला होता. त्यावेळीही शेतमजुरांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते.शेतमालकाकडून सर्वच सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या; परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी अनेक अडचणींना मजुरांना समोरे जावे लागले होते. सध्याच्या निर्बंधांची धास्ती या शेतमजुरांनी घेतली असल्यामुळे अनेक मजूर गावाकडे परतू लागले आहेत.सध्या खरीप हंगामपूर्व मशागत, उसाच्या खोडवा पिकाचे संवर्धन, कांदा काढणी, भुईमूग पेरणी व खुरपणी, डाळिंब, द्राक्षे पिकांची छाटणी, भाजीपाला पिकांची तोडणी, कांदे काढणे व साठवण करणे, द्राक्ष बागांची छाटणी करणे अशी शेतीची कामे चालू आहेत. या सर्व कामांसाठी मजूर वर्गाची मोठ्या प्रमाणात गरज भासते. या कामांसाठी परजिल्ह्यातील तर काही पेठ, सुरगाणा, नांदगाव, धुळे, अकोला, बागलाण, इगतपुरी या भागातील मजूर येत असतात. मात्र वाढत्या कोरोनामुळे अनेक मजुरांनी घराची वाट धरली आहे.स्थानिक मजूर घरीच...विदर्भ, मराठवाडा व नाशिकच्या इतर तालुक्यातील व परप्रांतीय मजूर या भागात स्थिरावले होते. मात्र सध्या लागू केलेल्या निर्बंधामुळे या भागातील बरेच मजूर आपापल्या गावी निघून गेलेले आहेत. तर स्थानिक मजूर संसर्गाच्या भीतीने घरीच बसून आहे. त्यामुळे शेतमालकांसमोर मजुरांच्या तुटवड्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या सावड पद्धतीने शेतीची कामे पूर्ण शेतकरी करत आहे. मात्र हे प्रमाण नगण्य आहे. स्थानिक मजुरांना विनंती करून कामाला बोलवावे लागत आहे. मात्र त्यासाठी अधिक पैसे मागत असल्याचे चित्र आहे.गोदाकाठ परिसरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव असल्याने कोणीही कामासाठी शेतावर यायला तयार नाही. त्यामुळे स्वतःच व कुटुंबातील सदस्यांना सर्व शेती कामे करावी लागत आहेत.- सोमनाथ शिंदे, द्राक्ष उत्पादक, चांदोरी.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती